त्यांच्यामुळेच रब्बी हंगामाची सुरुवात पिकांच्या राखरांगोळीने – स्नेहलता कोल्हे

त्यांच्यामुळेच रब्बी हंगामाची सुरुवात पिकांच्या राखरांगोळीने – स्नेहलता कोल्हे

It is because of them that the rabbi season begins with the crop ashes – Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu23 Nov.2021 18.40Pm.

कोपरगांव : चांगल्या पावसामुळे सर्वत्र धरणे भरलेली असताना गोदावरी कालव्यावरील लाभधारक शेतकरी रब्बीच्या आवर्तनापासून वंचित राहिला दुर्दैव असे की कालवा समितीची बैठक सुध्दा यांना घेता आली नाही, कारण महा विकास आघाडी सरकार व आमदाराचा पाटबंधारे खात्यावर अंकुशच राहिला नाही त्यामुळे रब्बी हंगामाची सुरुवातच पिकांच्या राखरांगोळीने झाली असल्याची जोरदार टीका भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.

यामुळे आधीच पिचलेल्या व हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी कालवा समितीची बैठक घ्या, रब्बी व उन्हाळी हंगाम आवर्तनाचे नियोजन करून रब्बी पिकांना पाणी सोडा, अशी मागणी त्यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.

सौ. कोल्हे पुढे म्हणाल्या की, युती सरकारच्या काळात नियोजनाअभावी कधीही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिले आहे. मात्र गेल्या दोन वर्षापासून उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग व नाशिक पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. चालू हंगामात सोयाबीन, मका, बाजरी, कापूस पिके शेतातच वाया गेली, महाविकास आघाडी शासनाने त्यांच्या नुकसान भरपाईची फक्त मखलाशी केली, पण प्रत्यक्षात असंख्य शेतक-यांच्या खात्यात भरपाईची रक्कमच दिली नाही, खरीपाचे नुकसान रब्बी पिकात भरून काढु अशी शेतक-यांना आशा होती. पण ती आता मावळली आहे.

सौ कोल्हे म्हणाल्या, कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबई ऐवजी लाभक्षेत्रात घेण्याच्या फुशारक्या मारल्या, बडेजाव केला, पण कालवा समितीची बैठक घेऊन चालु रब्बी व उन्हाळ हंगामाचे नियोजन करण्यात लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा सर्वच शेतक-यांना चांगलाच भोवला आहे. दुसरीकडे वीज बिलाच्या थकबाकी पोटी होणाऱ्या सुलतानी वसुलीमुळे विहिरींना पाणी असतानाही वीज खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांना पाणी भरता येत नाही असेही त्या म्हणाल्या,

चौकट

धरणे पाण्याने तुडूंब भरलेली आहेत, लोकप्रतिनिधी खुशाल झोपेचे सोंग घेत तुपाशी आहे, मात्र शेतकरी उपाशी आहेत,  कालवे सुटेना व वीज पुरवठा खंडित या दुहेरी संकटात गोदावरी कालवे लाभधारक शेतकरी सापडला आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकार फक्त गाजर दाखवत आहे. – सौ. स्नेहलता कोल्हे .

Leave a Reply

You cannot copy content of this page