कोपरगाव कारागृहातील ५० कैदी नाशिक जेलमध्ये रवाना

कोपरगाव कारागृहातील ५० कैदी नाशिक जेलमध्ये रवाना

50 inmates of Kopargaon jail sent to Nashik jail

 कोपरगाव : येथील तहसील कार्यालयालगत असलेल्या दुय्यम कारागृहातील ९१ कैद्यां पैकी पन्नास कैद्यांना क्षमतेपेक्षा जादा संख्या झाल्याने त्यांना नाशिक येथील दुय्यम कारागृहात चोख पोलीस बंदोबस्तात पाठवण्यात आले आहे.

आता कारागृहात ४१ कैदी येथे ठेवण्यात आले आहेत. क्षमतेपेक्षा जादा झालेल्या कैद्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे अशी माहिती नव्याने हजर झालेले तुरुंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.                         

कोपरगाव सब जेल बराकी

कैदी वर्ग होताच पोलीस प्रशासन व तुरुंग प्रशासनाने निश्वास सोडला आहे. येथील दुय्यम कारागृहात वर्षानुवर्ष क्षमतेपेक्षा जादा कैदी ठेवण्यात येतात. इतक्या मोठय़ा प्रमाणावर कैद्यांना वर्ग करण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे सर्व आरोपी खून, बलात्कार, दरोडा, बनावट नोटा प्रकरण, हाणामाऱ्या पाकीटमार, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविणे आदी गुन्हय़ातील आहेत.   कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात एकूण चार बराकी असून, त्यात कोपरगाव, शिर्डी, राहाता व लोणी या एकूण चार पोलीस ठाण्यांचे न्यायालयीन चौकशीतील कैदी ठेवण्यात येतात.

१६ कैद्यांची क्षमता असलेल्या या कारागृहात सुमारे ९१ चे वर कैदी होते. त्यांची सुरक्षा, औषधोपचारांचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळेही तहसीलदार  व निवासी नायब तहसीलदार  यांनी पुढाकार घेऊन हे कैदी अन्यत्र पाठवण्याच्या प्रयत्नात होते. तहसीलदार विजय बोरुडे यांनी हजर झाल्यावर कारागृहाला भेट दिली होती . पोलीस अधीक्षक मनोज पाटील शिर्डी उपविभागाचे पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही या गहन प्रश्नावर तुरुंग प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला होता.

कारागृह उपमहानिरीक्षक येरवडा यांना दिलेल्या पत्रात तुरुंग अधिकारी यांनी म्हटले आहे की कोपरगाव दुय्यम कारागृहाची बंदी क्षमता सोळा असताना येथे शंभरच्यावर कैदी ठेवण्यात आले आहेत , त्यामुळे कारागृहाची शांतता व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोपी नाशिकरोड किंवा औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात वर्ग करण्यात यावेत यासाठी परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव पाठवला होता .

त्यास ५० कैदी पाठवण्याची परवानगीकारागृह उपमहानिरीक्षक पश्‍चिम विभाग येरवडा येथील योगेश देसाई यांनी देऊन कैद्यांना  वर्ग करताना पोलीस पथकास सुरक्षाविषयक सूचनांचे पालन करून covid-19 चि तपासणी करून निगेटिव प्रमाणपत्रासह वर्ग करण्यात यावे अशा अटीवर देण्यात आली आहे. पन्नास कैद्यांची आर टी पी सी आर चाचणी करण्यात येऊन सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे कुलथे यांनी सांगितले. कुलथे यांनी या अगोदर तुरुंग प्रशासन प्रशासनाचे काम अत्यंत उत्तम रित्या सांभाळले आहे. दोन मोठ्या पोलीस गाड्या २५ शस्त्रधारी पोलीस एक पोलिस निरीक्षक एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक आशा पोलीस बंदोबस्तात त्यांना येथून शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकला वर्ग करण्यात आली आहे.                                   

चौकट.  राहाता तहसील कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून कैद्यांसाठी तुरुंग तयार आहे, मात्र तेथे सध्या रद्दी व भंगार साहित्य पडले असल्याचे समजते. तेथील कारागृह का सुरू केले जात नाही याबाबत सातत्याने आवाज उठू नाही दुर्लक्ष केले जात आहे. ते कारागृह सुरू केल्यावर निम्मा तान पोलीस प्रशासनावर चा कमी होणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page