कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी कृष्णाई मंगल कार्यालयात
Canal Advisory Committee meeting on Monday at Krishnai Mangal karalayat
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu25 Nov.2021 18.00Pm.
कोपरगाव : गोदावरी डावा कालवा समितीची बैठक सोमवारी २९ रोजी सकाळी दहा वाजता कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती आमदार संपर्क कार्यालय कोपरगाव येथून देण्यात आली आहे.
गोदावरी डाव्या-उजव्या कालवे सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बी व उन्हाळी हंगाम आवर्तनाचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी वारंवार शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून होत होती. यानुसारच मंत्रालयातून नामदार छगन भुजबळ यांच्या नावाने पाटबंधारे विभाग पाटबंधारे विभागाला गोदावरी डावा कालवा सल्लागार समितीची बैठक कोपरगाव येथे तर गोदावरी उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक राहता येथे संबंधित आमदार यांच्या उपस्थितीत घेण्यात यावी, असे आदेश दिले होते. सदर आदेशा अनुरूप सोमवारी २९ रोजी कोपरगाव डावा कालवा सल्लागार समितीची बैठक शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मागील पाच वर्षात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मुंबई येथे होत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता येत नव्हत्या त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी या कालवा समितीच्या बैठका कोपरगावात व्हाव्यात यांचा आग्रह घेतला होता. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बैठकीस उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन आमदार संपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान सोमवारी २२ रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गोदावरी डावा कालवा कार्यालयासमोर कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात यावी मागणीसाठी एक दिवसाचा बैठा सत्याग्रह केला होता. शेतकर्यांच्या वतीने ज्येष्ठ शेतकरी पदमाकांत कुदळे यांनीही रब्बी उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्यासाठी कालवा समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी एका पत्रकार परिषदेमध्ये केली होती. याच बरोबर या मागणीसाठी एक दिवसाचा बैठा सत्याग्रह केला होता. त्याची दखल पाटबंधारे विभागाने घेतली होती.





