श्रेयासाठी आमच्यामुळेच पुल स्थलांतरित झाल्याच्या बढाया – रोहिदास होन
Congratulations to Rohidas Hoon for moving the bridge because of us
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 19.10Pm.
कोपरगाव : सिन्नर-शिर्डी या एन.एच.-१६० या राष्ट्रीय महामार्गावरील झगडे फाटा नजीकचा उड्डाण पूल आ. आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनेप्रमाणे सर्व पर्यायांची तपासणी होऊन हा पूल कोपरगाव संगमनेर महामार्गावर करण्याचे निश्चित केले मात्र नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी अमावस्या, पोर्णिमा पाहणारे आता यासाठी आमच्यामुळेच पुल स्थलांतरित झाल्याच्या बढाया मारीत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहिदास होन यांनी केली आहे.
नव्याने घोषित झालेल्या सिन्नर-शिर्डी एन. एच.-१६० या राष्ट्रीय महामार्गाच्या नियोजित आराखड्यात ज्या ठिकाणी झगडे फाट्यावर हा उड्डाणपूल होणार होता त्या ठिकाणच्या व्यवसायिकांनी उड्डाण पुलाच्या नियोजित जागेत बदल करावा असे साकडे आ. आशुतोष काळे यांना घातले होते. रामदारा आशितोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेऊन चर्चेतून निश्चित केले होते. त्यानुसार हा उड्डाण पूल कोपरगाव-संगमनेर महामार्गावर होणार आहे. परंतु ज्यांचा काडीमात्र संबंध नाही ते मात्र आज आमच्यामुळे झाल्याच्या फुशारक्या मारत फिरत आहे. हे हास्यास्पद आहे. ज्यावेळी समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून जाणार होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जिरायती दाखवून जमिनी लाटल्या जात होत्या तेंव्हा तत्कालीन लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, शेतकऱ्यांशी चर्चा करायला यायला अमावस्या असल्यामुळे ज्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले ते काय उड्डाण पुलाची जागा बदलणार असा तिरकस सवाल रोहिदास होन यांनी केला.