कोपरगाव शहराच्या विकासासाठी बहुमताने सत्ता द्या- आ.आशुतोष काळे
Give majority power for development of Kopargaon city- MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 19.20Pm.
कोपरगाव: कोरोनाच्या अडचणीतही निधी आणला पण विकासाची मानसिकता नसल्याने बहुमतावर विरोध केला जात असल्यामुळे विकासाच्या बाबतीत कोपरगाव शहर मागे पडत चालले आहे. तेंव्हा येणाऱ्या निवडणुकीत बहुमताने सत्ता द्या असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी शहरातील पाच नंबर प्रभागातील राष्ट्रवादी युवक कांग्रेस शाखा कार्यक्रमात बोलताना केले.
आ. आशुतोष काळे म्हणाले, मागील निवडणुकीत निवडून आलेल्या आमच्या सात नगरसेवकांनी जनतेचा कौल मानुन सातत्याने विकास होण्यासाठी साथ दिली ,२०१९ ला जनतेने मला विधानसभेला निवडून देऊन साथ देऊन सेवा करण्याची संधी दिली. आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम पूर्ण केले. १२० कोटी ची तांत्रिक मंजूरी मिळवली दोनच वर्षात शहरासाठी १२ कोटी रुपये निधी आणला याउलट मागील पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांच्या पक्षाचे सरकार, सर्व परिस्थिती अनुकूल असतांना देखील त्यांना ते जमले नाही त्यामुळे विरोधक धास्तावले. त्यांनी शहरातील विकासकामांना बहुमताच्या जोरावर विरोध करून शहरातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे यापुढे हि परिस्थिती बदलावी लागणार आहे. कोपरगाव शहराचा विकास यापुढे थांबू देणार नाही. तुम्ही नगरपरिषदेची सत्ता द्या, विकास कामांना निधी आणायची व विकासाची जबाबदारी मी घेतो अशी ग्वाही दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शाखा संस्थापक संदीप देवळालीकर, अध्यक्ष अमोल देवकर, उपाध्यक्ष जुबेद अत्तार, सचिव सलीम शेख, संघटक नवजोत खरात, खजिनदार ओम दुसाने, नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, डॉ. तुषार गलांडे, सचिन परदेशी, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राहुल देवळालीकर, राहुल आदमाणे, दिनेश संत, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मुकुंद इंगळे, आकाश डागा, किशोर डोखे, रवींद्र राऊत,सागर लकारे, रितेश राऊत, बाळासाहेब सोनटक्के, एकनाथ गंगूले, पप्पु गोसावी, गोरक्षनाथ कानडे, महेश उदावंत, गणेश बोरुडे, संतोष टोरपे, संतोष बारसे, फिरोज पठाण, प्रसाद रुईकर, प्रा. अंबादास वडांगळे, मुकुंद भुतडा, श्याम शिरसाठ, गौतम खंडीझोड, संजय ठाकूर, अभिषेक कोकाटे, दिनेश पवार, शुभम लासुरे, विकी जोशी, मनोज नरोडे, हर्षल गवळी, जनार्दन शिंदे, रिंकेश खडांगळे, प्रताप गोसावी, प्रतिक रुईकर, किशोर लकारे, विजय शिंदे, बाळासाहेब देवकर, शुभम भुजबळ, समर्थ दिझिन, गौरव जंगम, सोमेश शिंदे, तेजस देवळालीकर, तुषार कहार, सोमनाथ शिंदे, निरंजन उदावंत, तुषार चिकने, स्वप्नील दुसाने, प्रसाद उदावंत, आशिष देवळालीकर, अनिकेत चिंचपुरे, सचिन खैरनार, काकासाहेब कहार, तुषार कहार, हारूण शेख, ओम बोराडे, मुन्ना पठाण, दिपक कराळे, शोएब शेख, अनिकेत पवार, अझर शेख, जावेद शेख, चांदभाई पठाण, आदी उपस्थित होते.