मविआकडुन कोरोना मयतांच्या वारसांना   ५० हजार अनुदान – आ. आशुतोष काळे

मविआकडुन कोरोना मयतांच्या वारसांना   ५० हजार अनुदान – आ. आशुतोष काळे

50,000 grant to heirs of Corona Mayat from Mavia – b. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 19.30Pm.

कोपरगाव: कोरोना मयतांच्या वारसांना महाविकास आघाडी सरकारकडून ५० हजारांचे सानुग्रह देण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

 आ.काळे म्हणाले,  कोविड आजाराच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झालेल्या कुटुंबाना आर्थिक आधार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने ५०,०००/- रुपये सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. नातेवाइकांनी राज्य शासनाने विकसित केलेल्या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी निधन झालेल्या व्यक्तीची कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे डॉक्टरांच्या मृत्यू अहवालात नमूद असणे गरजेचे आहे. तसेच ज्या व्यक्तीने कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आत्महत्या केली असल्यास या मृत व्यक्तीचे नातेवाईक देखील या सानुग्रह सहाय्यासाठी पात्र ठरणार आहेत.

अशा प्रकारे कोविडमुळे निधन झाल्याचे संबंधित अधिकाऱ्याच्या अहवालानुसार हे सानुग्रह सहाय्य देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदाराचा स्वत:चा आधार तपशील, बँक खात्याचा तपशील, कोविड-१९ मुळे मृत झालेल्या व्यक्तीचा तपशील, मृत झालेल्या व्यक्तीचे मृत्यू दाखला व इतर नातेवाईकांचे नाहरकत स्वयंघोषित घोषणापत्र आवश्यक आहे. आपले अर्ज दाखल करण्यासाठी कोपरगाव व कोळपेवाडी येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.                

Leave a Reply

You cannot copy content of this page