डाऊच खुर्दच्या उपसरपंच शिवसेनेच्या सौ. प्रमिला गुरसळ
Deputy Panch of Dauch Khurd, Mrs. of Shiv Sena. Pramila Gursal
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 19.40Pm.
कोपरगाव :तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या सौ प्रमिला चंद्रकांत गुरसळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रोटेशन पध्दतीने ग्रामपंचायतीच्या प्रत्येक सदस्यास उपसरपंचपदावर काम करण्याची संधी देण्यात येते. त्याच पद्धतीने सौ गुरसळ यांची निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय गुरसळ होते.
निवड प्रक्रिया चे कामकाज ग्रामसेवक जालिंदर पाडेकर यांनी पाहिले. यावेळी चंद्रकांत गुरसळ , सदस्य दिगंबर पवार ,सलीम भाई सय्यद, मनुताई पवार, वंदना पीठे ,स्वाती रणधीर ,सूर्यभान जाधव , शफिक भाई सय्यद ,बाळासाहेब गुरसळ ,सुनील गुरसळ, बालमभाई सय्यद ,मच्छिंद्र गुरसळ, दादाभाऊ गुरसळ, रावसाहेब पवार ,बाबासाहेब पवार ,दादाभाई सय्यद, अर्जुन होन ,मुन्ना भाई सय्यद ,गणेश रणधीर मेहबूब सय्यद ग्रामसेवक जालिंदर पाडेकर,देवा पवार आदी उपस्थित होते.