खोपडी कोल्हे गटाचे सरपंच,व शिवसेनेचे उपसरपंच राष्ट्रवादीत

खोपडी कोल्हे गटाचे सरपंच,व शिवसेनेचे उपसरपंच राष्ट्रवादीत

Sarpanch of Khopadi Kolhe group, and Deputy Sarpanch of Shiv Sena in NCP

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun28 Nov.2021 20.00Pm.

कोपरगाव: तालुक्यातील खोपडी ग्रामपंचायतीचे कोल्हे गटाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच संभाजीराव नवले व शिवसेनेचे उपसरपंच शिवाजीराव वारकर राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाला धक्का देत खोपडीमध्ये भाजपला भगदाड पडले आहे.   आ.आशुतोष काळे यांनी खोपडी ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचे लोकार्पण केले.

    यावेळी पंचायत सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,  संचालक बाळासाहेब बारहाते, जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, दिलीप दाणे, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार आदी उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे म्हणाले की, नांदूर मध्यमेश्वर कालव्याच्या प्रकल्पबाधित खोपडी व परिसरातील गावातील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा मोबदला मिळवून देऊन अनेक वर्षांचा प्रश्न सोडविला आहे. आता विकास कोण करीत आहे याची त्यामुळे अनेक विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला. तोच विकास यापुढे देखील होईल त्या विश्वासाला तडा न जाऊ देणार अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.            

याप्रसंगी तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिरसागर, गौतम बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूसाहेब घेमुड, राहुल जगधने, बाळासाहेब जगताप,  गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता गुंजाळ, विस्तार अधिकारी डी.ओ. रानमाळ, ग्रामसेवक श्रीमती शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.             

Leave a Reply

You cannot copy content of this page