तूर्तास रब्बीसाठी दारणा धरणातून दोन व उन्हाळी दोन ; रब्बीचे १५ डिसेंबरला पहिले आवर्तन सुटणार
Two from the Darna dam and two from the summer for the rabbi of Toortas; The first episode of Rabbi will be released on December 15
रब्बी आवर्तनाच्या दारणातील पाणी आढाव्यानंतर वाढीव आवर्तनाचे नियोजनPlanning of incremental cycles after reviewing the water in the rabbi cycle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon29 Nov.2021 17.00Pm.
कोपरगाव : सोमवारी (२९नोव्हेंबर ) रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाईत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी तूर्तास दारणा धरणातून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन,तर उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला.१५ डिसेंबरला पहीले आवर्तन धरणातून सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे रब्बीचे लांबलेले आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आ. आशुतोष काळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठयाबाबत माहिती दिली व उपलब्ध साठयानुसार रब्बीची दोन आवर्तने व उन्हाळी दोन आवर्तने देता येतील रब्बी आवर्तनाच्यानंतर दारणा धरणातील पाणी आढावा आढावा घेऊन पुढच्या आवर्तनाचे नियोजन करण्यात येईल अशी माहिती दिली.
प्रास्ताविक उपअभियंता तात्यासाहेब थोरात यांनी केले.
सप्टेंबर महिनाअखेरीस उपलब्ध असलेल्या धरणसाठ्याच्या आधारे शेती आणि शहराच्या पाण्याचा ताळेबंद मांडणारी कालवा समितीची १५ ऑक्टोबरच्या दरम्यान बैठक अपेक्षित असताना नोव्हेंबर महिना संपत आला. तब्बल सव्वा महिने उशिरा म्हणजे सोमवारी २९ नोव्हेंबरला घेण्यात आली. शेतीचे आवर्तन आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन या बैठकीत होणार होते. कालवा समितीची बैठक घेण्यास जाणूनबुजून उशीर केला जात आहे, असा आरोप अनेक शेतकऱ्यांनी सोमवारी केला.
या वेळी अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण श्रीमती अलका अहिरराव,आमदार आशुतोष काळे,कार्यकारी अभियंता सागर शिंदे, पं.स. सभापती पौर्णिमा जगधने, काळे कारखाना उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, ज्येष्ठ संचालक पद्माकर कुदळे कारभारी आठवण गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, राजेंद्र बापू जाधव उपस्थित होते.
या बैठकीत रब्बी हंगामासाठी १५ डिसेंबर ते १० जानेवारी २०२२ असे पहिले आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला असून रब्बीचे दुसरे आवर्तन २५ फेब्रुवारी ते ३० मार्च २०२२ असे सोडण्यात येणार आहे. या रब्बी आवर्तनानंतर २ रब्बी आवर्तनानंतर दारणा धरणातील पाणी आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. दरम्यान उन्हाळी हंगामासाठी १५ एप्रिल ते १२ मे तिसरे आवर्तन तर १३ मे ते ४ जून २०२२ चौथे आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता तात्यासाहेब थोरात यांनी दिली आहे.
दारणा धरण सलग दुस-या वर्षी शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे दारणा धरणातून रब्बी हंगामासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उशिरा का होईना रब्बी हंगाम बहरणार आहे.
यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने चंद्रशेखर कुलकर्णी, संजय काळे, पद्माकांत कुदळे, शिवाजी ठाकरे, साहेबराव रोहम, प्रवीण शिंदे, कैलास माळी, राजेंद्र खिलारी, सोमनाथ चांदगुडे, सुनील देवकर, नामदेव जाधव, रुपेंद्र काले तुषार विध्वंस यांनी रब्बीसाठी कालवा समितीची बैठक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी, आवर्तनाच्या तारखा निश्चित कराव्या व त्या पाळण्यात याव्यात, चाऱ्या दुरुस्ती करून घ्यावीत, पाणीपट्टी कमी करावी, रूजराती घेतल्या जात नाही, बोगस पाणीपट्टी रद्द करावी, सलग आवर्तन न देता मध्ये आठ दिवसांचा ब्रेक द्या, सिस्टीमचा नाही तर प्रशासकीय लोच कमी करा पाहण्याचा योग्य हिशोब द्या, ब्लॉकचे हक्काचे द्या, पाणी कॅनॉल इन्स्पेक्टर व अधिकारी नेमावेत, पाणी सोसायट्यांचे पाणी राखीव ठेवण्यात यावे, लॉसेस कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, आवर्तन सोडण्यात आलेला विस्कळीतपणा घालवुन व्यवस्थित नियोजन करावे, एम. डब्ल्यू. आर. आर.बरखास्त करण्यात यावे, कॅनॉल सुटल्यानंतर वर-खाली एकाच वेळी चाऱ्या सोडण्यात याव्यात, समन्यायी कायद्यात सुधारणा कराव्यात, असे अनेक प्रश्न मांडले व तारखा याच बैठकीत निश्चित करून घोषित करा अशी जोरदार मागणी केली. परंतु उजव्या कॅनल ची बैठक होणार असल्यामुळे दोन्ही बैठका झाल्यानंतर तारखा निश्चित करून कळवू असे अधिकाऱ्यांनी सांगितले .
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले सात नंबर फॉर्म भरा, पाणी मिळाले नाही तर ते त्यांच्याकडून कसे घ्यायचे, ते मी पाहतो, मेंढेगिरी समितीचा समन्यायी पाणी वाटप कायदा याबाब जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी बैठक घेऊन मार्ग काढू जास्तीत जास्त कसे मिळवता येईल हे बघू ! वहन क्षमता वाढविण्यासाठी नामदार जयंत पाटील यांनी दरवर्षी १०० कोटी देण्याचे मान्य केले आहे ८५ कोटी पैकी ४५ कोटींची टेंडर निघाली आहेत. पुढच्या टप्प्यात माती कामासाठी दीडशे कोटींचा प्रस्ताव तयार होत आहे. त्यानी आपल्याला आवडले आपल्याला दोन रब्बीची व दोन उन्हाळी आवर्तने देण्याचे सांगितले आहे परंतु दोन रब्बी व उन्हाळी तीन आवर्तने मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी शेवटी दिली. शेवटी आभार सिंचन शाखा पढेगाव शाखा अधिकारी एस.टी. ससाणे यांनी मानले.
चौकट :-
कालवा समितीमध्ये आवर्तनाच्या तारखा जाहीर करावे या कारणास्तव बैठक झाल्यानंतर काही जणांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला परिस्थिती हातघाईवर आल्यानंतर त्या ठिकाणी मिटवा मिटवी झाली .
मुंबईच्या बैठका कोपरगाव मध्ये घेतल्यामुळे नियोजित कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपल्या कार्यकर्त्यांना पाठवून गोंधळ घालण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी आहे. अशी प्रतिक्रिया आ.आशुतोष काळे त्यांनी व्यक्त केली.