संजीवनी इंजिनिअरींग : ३९ विद्यार्थी ३. ५ लाख पॅकेजवर विप्रो कंपनीत – अमित कोल्हे

संजीवनी इंजिनिअरींग : ३९ विद्यार्थी ३. ५ लाख पॅकेजवर विप्रो कंपनीत – अमित कोल्हे

Sanjeevani Engineering: 39 students  Wipro company 3. 5 lakh package – Amit Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue30 Nov.2021 16.00Pm.

कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या एसएपी या प्रशिक्षण केंद्राद्वारे २०२०- २१ च्या बॅचच्या ३९ विद्यार्थ्यांची विप्रो कंपनीने ३. ५ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.

अमित कोल्हे  पुढे म्हटले आहे की, इंजिनीअरिंगच्या पदवी परीक्षा परीक्षेनंतर लाखो रूपये खर्चुन आपल्या इंजिनिअरींग शाखा निहाय अधिकचा कोर्स करतात. संजीवनी इंजिनिअरिंगने पदवी घेत असताना एसएपी या कोर्स अंतर्गत २०० तासांचे अधिकचे शाखानिहाय प्रशिक्षण देण्याची सुविधा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना पाहीजे त्या चांगल्या कंपनीत व चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. त्या अनुषंगाने कंपनीने काॅम्प्युटर, मेकॅनिकल, इन्फर्मेशन टेक्नॅालाॅजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगच्या अक्षय संजिव फासले, अक्षदा दिपक तनपुरे, ऋतुजा विजय माने , ओंकार नानासाहेब तनपुरे, हर्षदा दत्तात्रय गिरमे, कांचन प्रेमचंद सुपे, राधिका सुनिल औताडे, अनिकेत ललितराव धनवटे, चैताली किशोर गुमर, स्नेहल महेंद्र जेजुरकर, प्रतिक्षा बाळासाहेब शेळके, वैष्णवी बाबासाहेब गुंजाळ, कोमल सुनिल जाधव, प्रगती अरविंद थोरात, तनुश्री रवि हलवाई, निखिल राजेंद्र भास्कर, संतोष दशरथ चव्हाण, नुतन गोकुळ भोसले, स्वाती गणपत जाधव, संकेत उध्दवराव सोळंके, श्वेता आसाराम वाडेकर, प्रतिक्षा बाळासाहेब फुंदे, सचिन मधुकर वाबळे, ऋषिकेश दत्तात्रय कोते, धनश्री चंद्रकांत वाघ, पुनम रानोबा रिठ्ठे, ज्ञानेश्वरी अरूण पवार, परमेश्वर अंकुश इंगळे, भरत भानुदास काकडे, रोहिणी संजय जगझाप, पोपट हनुमंत जाधव, तुषार सुरेश पटारे, सुहास बाळासाहेब गाढवे, सागर आप्पासाहेब घारे, दिक्षा युवराज आवारे, विशाल परसराम कथने, पौर्णिमा धनंजय आठरे, शुभम प्रकाश जगधने व मयुरी अनिल शेळके यां ३९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या निवडीबद्दल माजीमंत्री संस्थेचे संस्थापक शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, एसएपी कोर्सचे समन्वयक डाॅ. ए. बी. पवार व ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page