संजीवनी च्या विद्यार्थ्यांची रेनाटा व पोराईटमध्ये निवड- अमित कोल्हे
Selection of Sanjeevani students in Renata and Porite – Amit Kolhe
मेकॅनिकल इंजिनिअर्सची आकर्षक पगारावर निवड Selection of Mechanical Engineers on Attractive Salary
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon29 Nov.2021 16.00Pm.
कोपरगांव: संजीवनीअभियांत्रिकीच्या २०२०-२१ मधिल मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. व पोराईट इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपन्यांनीत आठ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर नोकरीसाठी निवड केल्याचे नेमणुकीचे पत्र बहाल करण्यात आलेे, अशी माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
रेनाटा प्रिसिझन काम्पोनंटस् प्रा. लि. या कंपनीने प्रितेश विश्वास मोरे, श्रेयश प्रकाश कुलकर्णी, अथर्व शैलेश जोशी व प्रसाद भाऊसाहेब साळुंके या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. पोराईट इंडिया प्रा. लि. या कंपनीने ऐश्वर्या भानुदास गाडेकर, ऋषिकेश कचरू भांड, कुणाल भारत आगलावे व शुभम माधवराव डांगे यांची निवड केली आहे.
हे सर्व विद्यार्थी ग्रामिण भागातील असुन त्यांच्या हातात नोकरीचे नेमणुक पत्र दिले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अत्यांनद दिसत होता. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विविध विद्या शाखांमधिल विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या हेतुने माजी मंत्री श्री शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना १९८३ साली केली होती, तो हेतु म्हणजेच ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्या, सरकारी आस्थापने, इत्यादींमध्ये नोकऱ्या मिळुन स्वावलंबी व्हावे, तसेच काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे. देश परदेशात संजीवनीचे अनेक माजी विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर आहेत तर काही नामवंत उद्योजक आहेत. हे केवळ पुस्तकी शिक्षण दिल्याने शक्य झाले नाही तर संजीवनीच्या व्यवस्थापनाने अनोखा संजीवनी पॅटर्न राबवित अनेक मैलाचे दगड पार केले आहेत, दरवर्षी आपलेच उच्चांक मोडीत काढत आंतरराष्ट्रीय पातळीवर संस्थेच्या नावलौकिकाच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे माजी विद्यार्थ्यांनीही अनेकदा संस्थेला भेट देवुन आपल्या स्मृती जागवतात, तसेच सध्या शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यास मदत होत आहे. विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्यांबाबत संस्थेचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन रेनाटा व पोराईट मध्ये निवड झालेल्या तसेच संस्थेचे डायरेक्टर (प्राचार्य) डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.





