संजीवनी एमबीएचा न्युयॅार्क मधिल निओडाॅक्टइन कंपनीशी सामंजस्य करार- अमित कोल्हे
Sanjeevani MBA Memorandum of Understanding with New York-based Neodactin Company – Amit Kolhe
संजीवनीची वाटचाल आंतरराष्ट्रीय पातळीकडे Sanjeevani’s journey towards international level
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 1 Dec.2021 18.50Pm.
कोपरगांवः संजीवनी एमबीए व इंजिनिअरींग काॅलेजने अमेरिकास्थित निओडाॅक्टोइन कंपनीशी सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती संजीवनी इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली आहे.
निओडाॅक्टोइन कंपनीच्या वतीने कंपनीचे ग्लोबल व्हाईस प्रसिडेंट अँड सीएफओ डाॅ. फनी भूषण सन्नीरप्पा यांनी परस्पर सामंजस्य कराराची प्रत पाठविली होती. त्यावर संजीवनीच्या वतीनेही सही करण्यात आली व कंपनीकडेही एक प्रत पाठविण्यात आली. यावेळी स्वतः अमित कोल्हे, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, एमबीए विभागाचे प्रमुख डाॅ. विनोद मालकर, व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा. इम्राण सय्यद उपस्थित होते.
अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की, निओडाॅक्टोइन कंपनीचा व्यवस्थापन, वैज्ञानिक आणि तांत्रिक सल्ला क्षेत्रात ८१ देशात कारभार चालतो. या कंपनीच्या मार्फत संजीवनी एमबीए व इंजिनिअरींग काॅलेजच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील औद्योगीक जगताशी निगडीत विशेष प्रषिक्षण देवुन कंपनीच्या सेवेत नोकरीसाठी सामावुन घेतले जाणार आहे. सध्याच्या परीस्थितीत कंपनीने संजीवनी एमबीएच्या वैजयंती प्रल्हाद काळे, राणी गुलाब झाल्टे, मृदूला उमेश पाटील व जुनेद इसमाईल शेख यांची इंटर्नशिपसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या सर्वच विद्या शाखांमधिल विद्यार्थी प्रत्येक संस्थेच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने अनेक नामवंत बहुराष्ट्रीय कंपन्याच्या कसोटीत उतरूण नोकरीत सामावल्या जात आहे. आता आंतरराष्ट्रीय कंपनीशी सामंजस्य करारामुळे संजीवनीच्या विद्यार्थ्यांना परदेशातही नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे.
संजीवनी शिक्षण संस्था ग्रामिण भागात असुनही आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर घेवुन जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपनीशी सामंजस्य करार करून संजीवनीने शैक्षणिक जगतात एक क्रांतिकारी पावुल टाकले आहे, असे श्री कोल्हे यांनी पत्रकात शेवटी म्हटले आहे. कराराच्या आंतरराष्ट्रीय उपलब्धी बाबत माजी मंत्री व संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे व कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले आहे.