इंडियन आयडॉल मध्ये गुंजला सुरभी कुलकर्णी चा आवाज  टॉप १४ निवड

इंडियन आयडॉल मध्ये गुंजला सुरभी कुलकर्णी चा आवाज  टॉप १४ निवड

Gunjala Surabhi Kulkarni’s voice in Indian Idol Top 14 selection

 बेला शेंडे अजय अतुल यांनी गोल्डन माईक देऊन केला गौरव Bela Shende Ajay Atul honored by giving a golden mic

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 1 Dec.2021 19.00Pm.

 कोपरगाव : सर्वसामान्य ब्राह्मण कुटुंबातील सुरभी केतन कुळकरणी हिने सुमारे आठ हजार स्पर्धक स्पर्धक आतून सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या इंडियन आयडॉल मराठी सिंगिंग रियालिटी शो मध्ये टॉप १४ मध्ये तिची निवड झाली आहे. संगीतकार अजय अतुल व पार्श्व गायिका बेला शेंडे यांनी सुरभी ची निवड करून तिला गोल्डन माइक देऊन गौरविले आहे.नगर जिल्ह्यातून ती या शोमध्ये निवडली गेलेली एकमेव स्पर्धक ठरली आहे.

संगीतकार अजय अतुल व गायिका बेला शेंडे सुरभी चे तोंड भरून कौतुक करून तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे सुरभी ला आज टीव्ही स्क्रीनवर पाहून कोपरगाव करांचा उर भरून आला सुरभी कुलकर्णी ही संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज च्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. ती चौथीपासून तिचे आई-वडील केतन व दीपाली कुलकर्णी यांच्या शारदा संगीत विद्यालयाच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात विविध धडे घेत आहेत. सुरभीने यापूर्वी अनेक रियालिटी शोज मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली आहेच, विविध टीव्ही शोज मध्ये ती सहभागी झाली असून आकाशवाणीवरून ही तिचे अनेकदा गायन प्रस्तुत झाले आहे. पुणे, इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये तसेच मुंबई, पुणे, नागपूर, इंदोर, गणपतीपुळे, नाशिक, नगर, शिर्डी आदी ठिकाणी तिचे विविध गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.

काही भक्तिगीतांच्या डीव्हीडीमध्ये सूर्याची गाणी प्रसिद्ध झाली असून अनेक पुरस्कारांनी तिला सन्मानित करण्यात आले आहे त्यामुळे सुरभी ने कोपरगाव चे नाव महाराष्ट्रात नव्हे तर देशात व परदेशात उंचावले आहे तिच्या या यशाबद्दल आ. आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी चे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, संजीवनी एज्युकेशन अमित कोल्हे, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, संजय सातभाई, अविनाश प्राध्यापक, धनंजय क्षीरसागर, आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page