मविआ सरकार २०२४ पर्यंत कोपरगावच्या ११ गावांना निळवंडे चे पाणी देण्यास प्रयत्नशील -आ. आशुतोष काळे
Mavia government is trying to provide Nilwande water to 11 villages of Kopargaon by 2024. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 4 Dec.2021 17.50Pm.
कोपरगाव : निळवंडे कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे कालव्याच्या कामाला वेग आला आहे.कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गटातील त्या जिरायती ११ गावांना २०२४ पर्यंत टेल टू हेड निळवंडे धरणाचे पाणी देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी बहादरपूर येथे कार्यक्रमात दिली यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार असल्याचे ते म्हणाले,
आ. आशुतोष काळे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी असतांना सुद्धा आजपर्यंत ६६६ कोटी निधी दिला आहे.भू संपादनासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देवून निळवंडे कालव्याच्या अडचणी दूर केल्या आहेत. त्यामुळे २०२४ पर्यत जिरायती भागातील अकरा गावात टेल टू हेड पाणी पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी भाजपाचे कोल्हे गटाचे विजय कोटकर, रामनाथ गव्हाणे, राहुल गव्हाणे,पुंजाहारी गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले. यावेळी अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, सुनील शिंदे, राहुल रोहमारे, योगेश खालकर, केशव जावळे, बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, युवराज गांगवे, किसनराव पाडेकर, देवेन रोहमारे, नरहरी रोहमारे, बाळासाहेब रहाणे, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, सुधीर पाचोरे, राजेंद्र पाचोरे, उत्तमराव कुऱ्हाडे, राहुल जगधने, नंदकिशोर औताडे, योगेश औताडे, बाळासाहेब औताडे, उपसरपंच गोपीनाथ रहाणे, आप्पासाहेब पाडेकर, कैलास गव्हाणे, बळीराम गव्हाणे, भास्करराव गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे, पोपटराव गव्हाणे, आकाश गव्हाणे, पर्वत गव्हाणे, सरपंच कविताताई गव्हाणे, बाळासाहेब रहाणे, काकासाहेब रहाणे, साईनाथ महाराज रहाणे, भाऊसाहेब रहाणे, रामनाथ पाडेकर, साहेबराव रहाणे, सोमनाथ रहाणे, वामनराव रहाणे, शिवाजीराव रहाणे, निवृत्ती गव्हाणे, तुळशीराम गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, तुकाराम गव्हाणे, बाबुराव गव्हाणे,दत्तात्रय रहाणे, जगन्नाथ पाडेकर, नानासाहेब रहाणे, दशरथ पाडेकर, नानासाहेब पाडेकर, आबासाहेब रहाणे, पाराजी रहाणे, अण्णासाहेब रहाणे, विलास रहाणे, नंदू पाडेकर, नानासाहेब रहाणे, रामनाथ रहाणे, जगन बोरसे विवेक गव्हाणे, विजय गव्हाणे, संतोष गव्हाणे, बाबासाहेब गव्हाणे, संतोष वर्पे, आदी मान्यवरांसह बहादरपूर व अंजनापूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.