कत्तलीसाठीची ३ जनावरे पकडली; चालकास अटक, दोन दिवस पोलीस कोठडी, तर खरेदीदार फरार

कत्तलीसाठीची ३ जनावरे पकडली; चालकास अटक, दोन दिवस पोलीस कोठडी, तर खरेदीदार फरार

वृत्तवेध ऑनलाईन 13 जुलै 2020

धुळे येथून संगमनेर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी जनावरे बजरंग दल व हिंदू राष्ट्राच्या कार्यकर्त्यांनी पकडून  कोपरगाव शहर पोलिसांच्या   स्वाधीन केली …

कोपरगाव : संगमनेर येथे कत्तलीसाठी घेऊन जाणारी ३ जनावरे हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग करून पकडली व कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केली . कोपरगाव शहर पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा चालक गणेश जगन सदाराम याला अटक करून कोपरगाव न्यायालयात हजर केले असता, त्याला बुधवारपर्यंत (१५ जुलै) दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.तर दुसरा आरोपी पवन ठाकरे हा मात्र फरार झाला आहे.

येवला येथून कोपरगाव कडे पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅन MH 41Au 0452 हा कत्तलीसाठी जनावरे घेऊन कोपरगाव कडे येत असल्याची माहिती पाठलाग करून येवला बजरंग दल कार्यकर्त्यांनी कोपरगावच्या हिंदूराष्ट्र कार्यकर्त्यांना दिली. या कार्यकर्त्यांनी ही पिकअप व्हॅन साईबाबा कॉर्नर येथे रविवारी  (१२ जुलै ) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास पकडली. व चालकासह कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केली मात्र खरीदार हा तेथून पळून गेला.

त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये ३ बैल मिळून आले. तीन बैल व एक पिकअप व्हॅन असा दोन लाख तीस हजाराचा मुद्देमाल कोपरगाव शहर पोलिसांनी जप्त केला आहे. त्यानंतर जनावरांची रवानगी गोकुळधाम गोशाळेत करण्यात आली. या प्रकरणी अमित अशोक जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारताच्या प्राण्यास निर्दयपणे वागविणे व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच जिल्हाधिकारी आदेशाचे उल्लंघन या अनुभव गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपी चालक गणेश जगन सदाराम यास कोर्टात हजर केले असता, त्याला कोर्टाने बुधवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ/1777 डि. आर. तिकोणे करीत आहे.

याप्रकरणी येवला बजरंग दलाचे मुन्ना भाऊ माडीवाले, प्रमोद घाटकर, भावसार हिंदुराष्ट्रवीर योगेश जगताप मयुर विधाटे, सुरज लटके, ऊमेश छुगानी मदत केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page