टाळेबंदीत  महर्षीच्या  कला शिक्षकाने मंदिरावर रेखाटली दैवतांची भित्ती चित्रे.

टाळेबंदीत  महर्षीच्या  कला शिक्षकाने मंदिरावर रेखाटली दैवतांची भित्ती चित्रे.

मंदिराचे बाहय सौंदर्य खुलंले

वृत्तवेध ऑनलाइन 13 जुलै 2020

कोपरगाव : तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील गोदावरी नदीकाठी असलेल्या पावन हनुमान व महादेव मंदिराच्या भिंतीवर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महर्षी विद्यालयाचे कलाशिक्षक महेश मुरलीधर शिंदे व रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी बाबुराव सोनवणे यांनी टाळेबंदी काळात वीर हनुमान व भोळ्या शंकराचे ऑइलपेंट रंगाच्या सहाय्याने अतिभव्य चित्र रेखाटले त्यामुळे या मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे.

संवत्सर गोदाकाठी पावन हनुमान मित्रमंडळाने हनुमान मंदिराचा आठ वर्षांपूर्वी जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या शेजारील साठ वर्षांपूर्वी चे महादेवाचे मंदिर आहे. या दोन्ही मंदिराच्या मागील बाजूच्या भिंतीवर ही दैवतांची चित्रे हुबेहूब पणे साकारल्याने असंख्य भाविकांनी त्यांचे कौतुक केले आहे, मयुर मधुकर जोशी यांनी याकामी सहाय्यकाची भूमिका बजावली.

पावन हनुमान मित्र मंडळाचे सर्व सहकारी या ठिकाणी दरवर्षी विविध उपक्रम राबवित असतात. कलाशिक्षक महेश मुरलीधर शिंदे हे 2007-०८ मध्ये ए टीडी परीक्षा पास झाले, व जी.डी आर्ट परीक्षा 2014 साली उत्तीर्ण झाले. त्यांनी महर्षि विद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांना चित्रकलेत नि पून करून जिल्हा व राज्यपातळीवरील बक्षीस स्पर्धेत मान मिळवून दिला आहे. कलाशिक्षक महेश शिंदे यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांनी आजवर ऑइल पेंट च्या रंगांमध्ये दैवतांची चित्रे रंगवली नव्हती, त्यांचा हा पहिलाच अनुभव होता. वीर हनुमान व शंकर महादेव ही चित्रे त्यांनी हुबेहूब पने साकारली आहेत. लक्ष्मण वाडी येथील मारुतीची मूर्ती त्यांनी यापूर्वी रंगवली होती. लॉक डाऊन च्या काळात त्यांनी हे चित्र रेखाटलेले. हा परिसर आणखीनच खुलून गेला आहे. सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव सोनवणे यांचे महेश शिंदे हे विद्यार्थी आहेत. शिवाजीराव सोनवणे यांनी महादेव मंदिराचा नंदी आणि पिंड रंगवून त्यावर सुरेख नक्षीकाम करत लॉकडाऊन काळाचा सदुपयोग या शिक्षकांनी केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page