मी केलेल्या वास्तू जनतेच्या सुखासाठी उपयुक्त ठरतील यातच मला समाधान – सौ स्नेहलता कोल्हे

मी केलेल्या वास्तू जनतेच्या सुखासाठी उपयुक्त ठरतील यातच मला समाधान – सौ स्नेहलता कोल्हे

I am satisfied that the structures I have built will be useful for the happiness of the people – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 10 Dec.2021 17.30Pm.

कोपरगाव : उद्घाटने तसेच लोकार्पण कधीही झाली व कोणीही केली तरी  त्यात मला सारस्ते नाही जनतेच्या हितासाठी जे प्रयत्न या इमारतींच्या मंजुरी व निधीसाठी मी केले त्या वास्तू जनतेच्या सुखासाठी उपयुक्त ठरतील यातच मला समाधान असल्याचे तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे नेहमीच म्हणत असतात असे भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी  प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे .

अद्यावत सुविधायुक्त नगरपालिका भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारत व भव्य अशा अद्ययावत अग्निशमन इमारतीचे लोकार्पण नगरपालिकेने शुक्रवारी १० डिसेंबर रोजी आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवले होते. कामांवरून श्रेयवादाचे राजकारण या मतदारसंघात चालते. त्याचा संदर्भ देत दत्ता काले यांनी पालिकेच्या वाचनालय व अग्निशमन या दोन्ही इमारतीच्या लोकार्पण सोहळ्या वरून आमदार आशुतोष काळे यांनाही टोला लगावला.

दत्ता काले पुढे म्हणाले ,कोपरगाव मतदारसंघात विकासाचा आलेख उंचावताना तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राजकीय गट-तट विरहित शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या बसस्थानक , पोलिस स्टेशन, पालिका अग्निशमन इमारत, पंचायत समिती इमारत व अधिकारी निवासस्थान, नगरपालिका नूतन इमारत,गोकुळनगरी पूल, बाजार ओटे,अशा देखण्या व लोकोपयोगी अद्ययावत वास्तू उभारल्या आहेत. आजचे युवक हे उद्याचे देशाचे भविष्य आहेत या विचारातून आपल्या भागातील विद्यार्थी भौतिक सुविधांमुळे मागे पडता कामा नये, वैशिष्ट्यपूर्ण योजना व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत रक्कम १ कोटी ३२ लक्ष,४३ हजार ४०३ रुपये निधीमधून भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारत उभी केली आहे. आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सौ. स्नेहलता कोल्हे यांना नागरिकांच्यावतिने आम्ही धन्यवाद देतो असेही शेवटी दत्ता काले म्हणाले.

चौकट

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जी कामे तुम्ही केली, ती आम्ही मान्य करतो, तशी आमची कामे तुम्ही मान्य करा. चांगल्या कामाचे कौतुक करायला शिका. फुकटचे श्रेय घेऊ नका.- दत्ता काले

Leave a Reply

You cannot copy content of this page