१०० बेडच्या २९ कोटी च्या उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता: आ.आशुतोष काळे

१०० बेडच्या २९ कोटी च्या उपजिल्हा रुग्णालयास प्रशासकीय मान्यता: आ.आशुतोष काळे

Administrative Approval for 100  Bed 29 crore Sub District Hospital: MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 10 Dec.2021 17.40Pm.

कोपरगाव : ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे यास महा विकास आघाडीच्या आरोग्य मंत्रालयाने कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी दिली होती. आता उपजिल्हा रुग्णालयास २८.८४ कोटीच्या प्राथमिक अंदाजपत्रक आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या दृष्टीने आरोग्य विभागाकडे कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी वारंवार मागणी केली होती. त्या पाठपुराव्यातून महाविकास आघाडी सरकारने २८.८४ कोटीची प्रशासकीय मान्यता दिली आहे.यामुळे कोपरगाव शहरात सुसज्ज असे रुग्णालय उभे राहणार आहे. या रुग्णालयात नागरिकांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्थ रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नसून आरोग्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page