कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्याचा वारसा पुढे चालवू : आ.आशुतोष काळे

कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालण्याचा वारसा पुढे चालवू : आ.आशुतोष काळे

We will carry on the legacy of adding to the glory of Kopargaon city: MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 10 Dec.2021 17.50Pm.

कोपरगाव : ज्याप्रमाणे माजी आ.अशोक काळे यांनी कोपरगाव शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा न्यायालय, ग्रामीण रुग्णालय, पशुवैद्यकीय दवाखाना, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आदी प्रशासकीय इमारती उभारून कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली. तोच वारसा पुढे चालवून सर्व शासकीय इमारतींसाठी निधी मिळवून देऊ अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व फायर ब्रिगेड इमारतीचे लोकार्पण प्रसंगी दिली. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थित होते.

आ आशुतोष काळे म्हणाले की, प्रशासकीय इमारती शहराचे वैभव असतात या इमारती सुरक्षित राहण्यासाठी तसेच या इमारतींचा दुरुपयोग होणार नाही याची प्रशासन व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. वाचनालयाच्या इमारतीची फर्निचरची गरज लक्षात घेऊन वाचनालयाच्या फर्निचरसाठी व विविध प्रकारच्या पुस्तकांसाठी निधी देऊ. या वाचनालयातून चांगले विद्यार्थी व नागरिक घडतील चांगले अधिकारी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनाने सर्व शासकीय इमारतींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही व सिक्युरिटीची व्यवस्था करावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.    यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी,  धरमचंद बागरेचा,  गोरक्षनाथ जामदार,  शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे, हाजी मेहमूद सय्यद, सौ. प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, सौ. वर्षा शिंगाडे,  आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

चौकट:

कोपरगाव नगरपालिकेच्या आग्रहास्तव लोकप्रतिनिधी या नात्याने शासकीय इमारतींच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिलो. तहसील कार्यालय, पंचायत समिती व वाचनालयाला देखील फर्निचर व पुस्तकांसाठी निधी देणार – आ. आशुतोष काळे.   

Leave a Reply

You cannot copy content of this page