शहर विकासासाठी, पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक : आ. आशुतोष काळे
For city development, power of NCP is necessary in the municipality: Mla Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir 10 Dec.2021 18.00Pm.
कोपरगाव: कोपरगाव शहराचा रखडलेल्या विकासाला चालना देण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आवश्यक असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.
एस एस जी एम कॉलेज समोरील प्रभाग क्रमांक चार मधील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ३१ लक्ष ०१ हजार रुपये निधी व २३ लक्ष ६६ हजार रुपये निधीतून नगर-मनमाड हायवे ते साईधाम मंदिर रस्त्याच्या डांबरीकरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे उपस्थितीत होते. आ. आशुतोष काळे म्हणाले , कोपरगाव शहरविकासासाठी जास्तीत जास्त निधी आणलेला आहे व यापुढेही आणणार आहे. मात्र आलेला निधी वेळेत खर्च होऊन होणाऱ्या विकासकामांचा शहरवासीयांना उपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी ज्यांच्याकडे पालिकेची सत्ता आहे त्यांच्याकडे विकासाची मानसिकता असणे देखील महत्वाचे आहे. दुर्दैवाने हि मानसिकता मागील पाच वर्षात दिसून न आल्यामुळे शहरविकास रखडला आहे. व त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. भविष्यात हि परिस्थिती बदलण्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता द्या शहराच्या रखडलेल्या विकासाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपस्थितांना आ.आशुतोष काळे यांनी दिला. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, आदींसह नागरिक उपस्थित होते.





