कोपरगाव च्या वीरभद्र यात्रेत भगताने २०२२ चे भविष्य वर्तवले
In Kopargaon’s Virbhadra Yatra, Bhagat foretold the future of 2022
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat 11 Dec.2021 17.00Pm.
कोपरगाव :आगामी वर्षात ज्येष्ठ महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडल…. गाई चाऱ्याला लागतील ….पिवळ्या रंगाच्या वस्तू यांना महागाई राहील…. आषाढ महिन्यात पंधरा दिवस अगोदर पाऊस लांबू शकलं…. कमीत कमी दोन वर्ष मनुष्याला पिडा राहील …. जगाच्या कानाकोपऱ्यात आपत्ती येईल…असे भाकीत येथील वीरभद्र उर्फ बिरोबा महाराज यात्रेत भोजडे येथील भगत रामदास मंचरे यांनी वर्तवले. अशी माहिती कांतीलाल मैदड यांनी दिली.
यावर्षी भगूर हनुमंत गाव धोत्रे भोजडे नागमठाण तालुका वैजापूर व कोपरगाव येथील बिरोबा दर्शनासाठी आल्या होत्या. यांचे पारंपारिक पद्धतीने जोगेश्वर हनुमान मंदिराजवळ भगत मंडळीने स्वागत केले. मिरवणुकीने कर्ण महाल काठ्या बिरोबा चौकात वाजत गाजत आणण्यात आल्या आश्वासह नागरिक महिलांनी त्यात सहभाग घेतला. यावेळी फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. महिलांनी पारंपारिक पद्धतीने देवाची ओवाळणी केली .यावेळी धनगरी ओव्या म्हटल्या . डफ वाजून नृत्य करण्यात आले महाआरती होऊन मसाले भात व बुंदी चा महाप्रसाद वाटण्यात आला. शहरातील जागृत व ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची चंपाषष्ठीनिमित्त ही यात्रा साजरी केली. होइक भविष्य वर्तवले गेले अशी माहिती कांतीलाल मैंदड यांनी दिली . यंदाची यात्रा ही शतकोत्तर उत्सवाची आहे. सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने सोशल डिस्टंसिंग पळून ही यात्रा साजरी केली आहे. शहरातील जुन्या गावठाण भागात बिरोबा चौक येथे असलेल्या या मंदिरात जवळपास सव्वा चारशे ते पाचशे वर्ष होऊन गेले असून त्याची स्थापना सन १६०१ मध्ये करण्यात आली . ह्या मंदिराचा ९९ वर्षापूर्वी १९२० साली जीर्णोद्धार करण्यात आला होता. प्राचीन परंपरा असलेल्या या देवस्थानाची देखभाल मंडळ भगत मंडळी करतात . यात्रे विषयी माहिती देताना ते म्हणाले की , १० डिसेंबर रोजी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभ्यंगस्नान महामस्तकाभिषेक धार्मिक पूजा विधी, कावडीची मिरवणूक काढण्यात आली कर्ण महाल काठया बाहेरगावहून आलेल्या भगत मंडळींचे येथील जबरेश्वर हनुमान मंदिराजवळ पारंपरिक पद्धतीने स्वागत केले . स्थानिक भगत मंडळी कर्ण महाल काठ्यांची पूजा करतात. पान सुपारी देऊन मिरवणूक सराफ बाजार शिवाजी रोड मार्गे या काठ्या मानाने वाजत गाजत बिरोबा मंदिरात आणल्या . त्यानंतर पारंपारिक धनगरी ओव्या, डफ वाजवणे, नृत्य करणे व सायंकाळी भविष्य होइक ,महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कर्ण महाल काठ्या दहेगाव, धोत्रे, भोजडे, कोपरगाव बेट, तळेगाव मळे, भगूर ,हनुमंत गाव, विरगाव ,वैजापूर आदी ठिकाणाहून येथे येऊन त्यांची देव भेट होते. या काठ्याना निशाण, झालंर, मोरपिसे, फुलांच्या माळांनी सजवले जातात. मिरवणूक झाल्यानंतर वीरभद्र महाराजांना साकडे घालून जाब विचारण्याची प्रथा आहे. गुरुवार, रविवार पौर्णिमेच्या दिवशी ही वीरभद्र महाराज यांना जाब विचारला जातो . त्यामुळे या यात्रेला कोपरगाव शहर व परिसरातील भाविकांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. यावेळी भगत सुदाम बुट्टे आप्पा बुट्टे विठ्ठल राजेंद्र रामदास आदमाने दीपक संतोष दत्ता शुभम तेजस मैंदड यांच्यासह महिला तरुण-तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.