मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी- आ. आशुतोष काळे

मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना मंजुरी- आ. आशुतोष काळे

Approval for Malegaon Thadi, Wari-Kanhegaon water supply schemes. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed15 Dec.2021 16.30Pm.

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी, वारी-कान्हेगाव पाणीपुरवठा योजनांना गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील बहुतांशी गावे हि मोठ्या लोकसंख्येची असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण वर्षानुवर्षापासून जाणवत होती. विशेषतः महिला भगिणींना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, वारी-कान्हेगाव, मळेगाव थडी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर या गावातील पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळावी यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांची भेट घेतली होती. या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी केली होती. याबाबत माहिती देताना आ. आशुतोष काळे म्हणाले, उर्वरित कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारी, मायगाव देवी, जेऊर कुंभारी व शिंगणापूर गावांच्या पाणीपुरवठा योजनांना देखील मंजुरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे असे त्यांनी सांगितले. वरील योजनांना मंजुरी दिल्याबदल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे आ.आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

चौकट:- मळेगाव थडी व वारी-कान्हेगावचा वर्षानुवर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्यामुळे मार्गी लागल्याने येथील नागरिकांसह महिला भगिणींनी आ.आशुतोष काळे यांचे विशेष आभार मानले आहे. यावरून शब्द पाळणारा नेता अशी प्रतिमा आ.आशुतोष काळे यांची तयार झाली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page