सौ. सुशीलामाई काळे राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा सुरू
Sav. Sushilamai Kale launches state level online oratory competition
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed15 Dec.2021 16.40Pm.
कोपरगाव : तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयतच्या राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे स्व. सौ. सुशीलामाई काळे राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा सुरु झाल्या,अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. पौर्णिमा जगधने होत्या.
यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम म्हणाले स्व. सौ. सुशीलामाई काळे यांनी मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. मुलींसाठी शाळा सुरु कराव्यात असा त्यांचा आग्रह होता. त्यांची तळमळ पाहून कर्मवीर शंकरराव काळे यांनी अनके ठिकाणी महिला विद्यालय व महाविद्यालय सुरु केले. माईंच्या स्वप्नामुळे या महाविद्यालयात लाखो मुलीनी शिक्षण घेतले असून शिक्षण अक्षर मुलींच्या शिक्षणात माईंचे योगदान मोठे आहे आहे असे ते म्हणाले .
कार्यक्रमास स्कूल कमिटी सदस्य संभाजीराव काळे, कचरू कोळपे, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. आय. के. सय्यद, भाऊसाहेब लुटे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव सोनवणे, मुख्याध्यापिका सौ. छाया काकडे, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक रमेश मोरे, ज्यू. कॉलेज विभागप्रमुख अंगद काकडे, विविध शाखेतून आलेले परीक्षक इत्यादी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन रवींद्र मेढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक सुरेश खंडीझोड, प्रभाकर आभाळे आदी शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक यांनी परिश्रम घेतले.





