कोपरगावच्या राजकीय घडामोडींना येणार वेग विद्यमान नगरसेवकांची मुदत संपतेय २९ डिसेंबरला !

कोपरगावच्या राजकीय घडामोडींना येणार वेग विद्यमान नगरसेवकांची मुदत संपतेय २९ डिसेंबरला !

Kopargaon’s political developments will speed up The term of existing corporators expires on December 29!

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed15 Dec.2021 16.50Pm.

कोपरगाव : विद्यमान नगर पालिकेचा कार्यकाळ २९ डिसेंबर रोजी संपतोय. त्यामुळे राजकीय घडामोडींना येणार वेग आपापल्या वार्डातील उर्वरित विकास कामे पूर्ण करून घेण्यासाठी विद्यमान नगरसेवकांच्या हातात आता अवघे १५ दिवस उरले आहेत. पुढील दोन दिवसात पालिकेची शेवटीची होणारी सर्वसाधारण सभा अगदीच सोसो ठरणार .

कार्यकाळ मुदत २९ तारखेपर्यंत असल्यामुळे आणखी एखादी विशेष सर्वसाधारण सभा घेता येऊ शकते अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

शेवटच्या सभेतील विषय अगदीच किरकोळ असल्याने सत्ताधारी व विरोधीपक्ष यांना सर्व विषय मंजूर करावे लागतील. दरम्यान, पुढील काही दिवसात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग येण्याची शक्यता असून २९ डिसेंबर नंतर पालिकेवर प्रशासक राज बसणार असल्याचीही चर्चा आहे. पालिकेची प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया जोपर्यंत पार पडत नाही, तोपर्यंत निवडणुकांच्या संदर्भातील पुढचा टप्प्याला सुरुवात होऊच शकत नाही. दुसरीकडे या महिन्याच्या अखेरी २९ डिसेंबर रोजी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे. या तारखेपर्यंत पालिकेचे नवीन सदस्य अर्थात नगरसेवक निवडणे किंवा विद्यमान सदस्यांना मुदतवाढ मिळणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नसल्याने येत्या काही दिवसात शासनाकडून पालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्‍य सरकार न्यायालयात गेल्यामुळे निवडणुकीच्या तारखा गुलदस्त्यात आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात पालिकेची शेवटीची सर्वसाधारण सभा होणार असल्याचे कळते. ही सभा वादळी होईल अशी शक्यता वाटत होती . कारण शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजपसेना जास्तीत जास्त विकासकामे मंजूर करण्याचा प्रयत्न करतील. तर विरोधीपक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस विविध मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना जाब विचारात धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील. परंतु ३७ विषय असलेल्या लांबलचक विषय पत्रिकेत विषय क्रमांक एक प्रोसिडिंग वाचणे विषय क्रमांक २ ते ८ अस्थापना च्या अहवालानुसार कर्मचाऱ्यांना कामावर घेणे, नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२२ करता खर्चास मंजुरी देणे, माझी वसुंधरा अभियानांतर्गत नर्सरी निर्माण करणे, कोर्ट विभागाच्या अहवालानुसार प्रशासकीय कामासाठी प्रशासकीय प्रमुखांना वाहन वापराच्या प्रस्तावावर विचार विनिमय करणे, वाचनालयासाठी फर्निचर खरेदी करणे, नगरपालिकेचे विविध विभागांसाठी २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाकरिता निविदा काढणे, संगणकासाठी दोन सर्वेअर खरेदी करणे, मार्केट विभागाच्या वारानुसार महाशिवरात्री जागा भाडे देणे प्रस्तावावर विचार विनिमय,कै.बाबुलाल वाणी व्यापारी संकुल व फ्रुट मार्केट गाळ्यांचे थकीत भाडे करारनामा विचार विनिमय करणे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक निधीतून कर्मवीर नगर येथे सामाजिक सभागृह बांधणे, पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून कामाच्या निवडीबाबत विचारविनिमय करणे, बस स्टँड येथील शिवाजी महाराज संकुलाचे गाळे दुरुस्ती, सर्वे नंबर २१०/१ बारा मीटर नवीन रस्ता प्रस्तावित करणे विषय क्रमांक २१ व २२ विविध संस्थांनी पालिका हद्दीतील रिकाम्या जागा विकसित करण्यास मागितली असल्याचे सात अर्ज आले असून त्यावर विचारविनिमय करणे, विषय क्रमांक २३ ते २७ आरोग्य विभागाच्या अहवालावर विचारविनिमय करणे, २८ ते ३० विद्युत विभागाच्या अहवालावर विचारविनिमय करणे विषय ३१ सिटी सर्वे नंबर १९२४ मध्ये हिंदू समाजातील दफनभूमीसाठी जागा देणे, विषय क्रमांक ३२ कै. खासदार श्री सूर्यभानजी वहाडणे प्रतिष्ठान यांच्या करारनाम्याच्या मुदतीत वाढ करणे अर्जावर विचार विनिमय करणे, विषय क्रमांक ३३ छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार अशी कमान उभारणे अर्जावर विचार विनिमय करणे, विषय क्रमांक ३४ निळवंडे व नांदूर-मधमेश्वर पाणी आरक्षण ठेवणे बाबतअर्जावर विचार विनिमय करणे, स्वर्गीय श्री नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज ला यांचे वापरातील इमारतीच्या भाडेकराचे नुतनीकरण करणे अर्जावर विचार विनिमय करणे, विषय क्रमांक ३६ सन्माननीय सदस्यांच्या आलेल्या अर्जावर विचारविनिमय करणे, व शेवटचा विषय क्रमांक ३७ माननीय अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आयत्या वेळेस येणारे विषयावर विचारविनिमय करणे विकास कामांसाठी हातात उरले केवळ शेवटचे १५ दिवस!

दुसरीकडे पालिकेची मुदत संपणार असल्यामुळे पुढील निवडणुकीची रणनीती आखायला राजकीय पक्षांनी सुरुवात केली आहे. पालिकेत आजच्या घडीला भाजप सेनेची सत्ता आहे. भाजपकडे १४ नगरसेवक तर सेनेकडे ६ नगरसेवक राष्ट्रवादीकडे ६ नगरसेवक असून एक अपक्ष नगरसेवक आहे. थोडक्यात आता पालिकेच्या सभागृहातील नगरसेवकांच्या हातात आपापल्या वार्डातील उर्वरित विकास कामी मंजूर करून घेण्यासाठी हातात केवळ शेवटचे १५ दिवस उरले आहेत. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यास मार्चच्या सुरुवातीस निवडणुका होण्याची शक्यता आहे.

अंदाजे पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप कच्चा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच हा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आराखडा निश्चित होण्यास साधारण महिनाभरचा कालावधी लागून शकतो. त्यानंतरअंतिम प्रभाग रचना व आरक्षण सोडत होईल. त्यावर हरकती मागवल्या जातील. त्यामुळे पालिका निवडणुकांना आणखी किमान दीड-दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. थोडक्यात ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यास पालिकेची निवडणूक एकतर फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page