विकासाच्या मागे जनता यावर माझा विश्वास – आ. आशुतोष काळे
My belief in the people behind development – Mla. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 18.00Pm.
कोपरगाव: मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांपर्यंत विकास पोहचविणे हे माझे कर्तव्य असून गावात सत्ता असो वा नसो प्रत्येक गावाला समान न्याय देत आहे. विकासाच्या मागे जनता यावर माझा विश्वास असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी संवत्सर येथे विविध रस्त्यांच्या कामाप्रसंगी केले .
आ. आशतोष काळे म्हणाले की, जनतेला विकास हवा होता म्हणून कोरोना असतानाही विकास अनुशेष भरून काढण्यासाठी निधीचा रतीब लावला आहे. जनतेच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की जनता विकासाच्या मागे उभी राहते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन केले.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, बाळासाहेब बारहाते, सदस्य मधुकर टेके, जिनिंग चेअरमन गोरक्षनाथ जामदार, रायुकॉंचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, दिलीप बोरनारे, बाबासाहेब कासार, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब आबक, तुषार बारहाते, बबनराव बारहाते, गोवर्धन परजणे, राजेंद्र भाकरे, सुनील कुहिले, राहुल जगधने, पी.डी. आहेर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.