२८ कामे कोर्टात नेली तेंव्हा नागरिकांना विश्वासात घेतले होते का? – सुनील गंगुले

२८ कामे कोर्टात नेली तेंव्हा नागरिकांना विश्वासात घेतले होते का? – सुनील गंगुले

Were the citizens taken into confidence when 28 works were taken to court? – Sunil Gangule

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 18.30Pm.

 कोपरगाव: शहराची तहान भागविण्यासाठी मैलाचा दगड ठरणारा पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांबाबत गल्लोगल्ली फिरून संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधक करीत आहे. २८ कामे कोर्टात नेतांना शहरातील नागरिकांना विश्वासात घेतले होते का? असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी केला आहे.

श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव व वितरीकांसाठी १२० कोटीची तांत्रिक मंजुरी मिळविली आहे. मात्र विरोधक जाणून बुजून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करीत आहे . विरोधकांना कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला उर्जितावस्था आणण्याचे वक्तव्य हे पुतना मावशीचे प्रेम असल्याची टीका गंगुले यांनी पत्रकातून केली.

सुनील गंगुले म्हणाले, जर त्यांनी विरोध केला नसता तर शहरातील रस्त्यांची कामे दिवाळीच्या अगोदरच पूर्ण झाली असती. खराब रस्त्यांमुळे बाहेर गावातील नागरिक कोपरगाव शहरात आले नाही त्याचा फटका छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला. तेंव्हा येणाऱ्या निवडणुकीत शहरातील नागरिक कोल्हे गटाच्या नगरसेवकांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असे गंगुले यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page