“शिकू आनंदे” मध्ये आरती कोरडकर यांचे सादरीकरण..

“शिकू आनंदे” मध्ये आरती कोरडकर यांचे सादरीकरण..

Presentation by Aarti Kordkar in “Shiku Anande”.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 18.40Pm.

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिकू आनंदे या राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यक्रमात नगरपालिका शाळा क्र.६ च्या शिक्षिका आरती कोरडकर यांनी देवीचा जागर या प्रकारात गीतगायन सादर केले.

त्यांच्या गायनाने त्यांनी राज्यभरातील विद्यार्थ्यांची, शिक्षकांची मने जिंकली. यावेळी भरत आगळे,देवराम खेमनर व वैभव आगळे यांनी साथसांगत दिली. प्रशासनाधिकारी श्री तुंबारे साहेब सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट शासनाचा ‘शिकू आनंदे’ हा कार्यक्रम दर शनिवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतला जातो व त्यामाध्यमातून कवायत,लोकरकाम, नृत्य, गायन,प्रश्नमंजुषा याबाबतचे आनंददायी ऑनलाइन शिक्षण दिले जाते.

शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाला सुरुवात झाली राज्य समन्वयक विक्रम अडसूळ सर व ज्योती बेलवले ताई यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम पार पडतो. विविध कलांचा इतर अनेक विषयांशी समन्वय साधून हसत खेळत शिक्षण घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page