नागरिकांनो अन्न आणि औषध खरेदी करताना डोळे उघडे ठेवा -सुमित सिनगर
Citizens keep their eyes open while buying food and medicine – Sumit Singer
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu16 Dec.2021 19.00Pm.
कोपरगाव : अन्न आणि औषध ग्राहक वेलफेयर कमिटी, ही ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. कोणत्याही गोष्ट आपण कुठेही खरेदी करा परंतु डोळे उघडे ठेवून नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन कमिटीचे नगर जिल्हा अध्यक्ष सुमित सिनगर यांनी केले आहे .
सुमित सिनगर म्हणाले, अन्न आणि औषध ग्राहक वेलफेयर कमिटीचे ध्येय नागरीकांना उत्तम प्रतीचे औषधे / सौंदर्य प्रसाधने आणि सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करुन देणे त्याचबरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करुन देणे स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ तयार केले जातील याबाबत दक्ष रहाणे . तसेच सुरक्षित व आरोग्यदायी अन्न पदार्थ उपलब्ध करणे.सुरक्षित स्थिर व परिणामकारक औषधे उपलब्ध करणे. सुरक्षित सौंदर्य प्रसाधने उपलब्ध करणे.उच्च प्रतीची गुणवत्ता ठेवून अन्न व औषधातील संभाव्य धोक्यांचे निराकरण करणे,हे अन्न आणि औषध ग्राहक वेलफेयर कमिटीचे पदाधिकारी महाराष्ट्रभर कायद्याच्या कक्षेत राहून कार्य करत असतात.
सुमित सिनगर पुढे म्हणाले, ग्राहकांना चांगले उत्पादने उपलब्ध करणे, अन्न धान्यामध्ये भेसळ, रस्त्याच्या कडेला मिळणारे खाद्य पदार्थ,मिठाईची दुकाने (अनेक ठिकाणी मिठाईवर एक्सपायरी डेट मेंशन नाही) अनेक ठिकाणी fssai लायसेंस नाहीत, अस्वछता, असे अनेक शरीरास घातक असलेले पदार्थ, अनेक कंपन्याचे दूध,मिनरल पाणी,अशा अनेक वस्तु बिनधास्तपणे विक्रीस ठेवल्या जात आहेत. प्रोडक्ट वरील एक्सपायरी डेट तपासून घ्या, प्रोडक्टचे पैकिंग व्यवस्थित आहे का ते पहा,एमआरपी असेल तेवढेच पेमेंट करा. नेहमी बिल मागून घ्या. स्वछतेचा अट्टाहास करा,आणि जर काही आपणास चुकीचे आढळल्यास अंडर consumer protection act २०१९ जे अधिकार दिले आहेत त्याच्या अंतर्गत आपण तक्रार करु शकता.
सध्या महाराष्ट्रात अनेक इंडस्ट्रीज आहेत तिथे देखील कामगारांना सुरक्षित राहण्याची साधने, आरोग्याच्या दृष्टीने वातावरण, त्यांचा इन्शुरन्स, स्वछता मेडिकल हेल्प, अशा अनेक सुविधा असणे गरजेचे आहे. आणि म्हणुनच आमची संस्था संस्थेचे पदाधिकारी शासन आणि ग्राहक यांच्या मधील दुवा बनुन सामाजिक काम करत आहे. असे सुमित सिनगर यांनी सांगितले.