नाताळात शिर्डीकडे येणारी अवजड वाहतूक बाह्य मार्गाने वळवा, पोलीस कुमक वाढवा – अध्यक्ष आ. आशुतोष काळे
Diversion of heavy traffic, increase police support – President Mla. Ashutosh Kale
दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्याAllow children under the age of ten to visit
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 19.00Pm.
कोपरगाव :- साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांना लहान मुलांना साई दर्शनाची परवानगी नसल्यामुळे अडचणी येत आहेत. त्यामुळे दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनाची परवानगी द्यावी नाताळ सुट्टीचा विचार करता शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवावी व अतिरिक्त पोलीस कुमक वाढवावी अशी मागणी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे की, घटस्थापनेपासून शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर देखील साईभक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र दहा येणाऱ्या साईभक्तांना आपले दहा वर्षाच्या आतील मुलांना दर्शनाची परवानगी नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नागरिक योग्य काळजी घेत असल्यामुळे व आरोग्य विभाग प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबवीत असल्यामुळे जिल्ह्यात व राज्यात कोविड संसर्ग नियंत्रणात आहे. शिर्डीतील साईमंदिरात देखील कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. त्यामुळे साईभक्तांच्या दहा वर्षाखालील मुलांना साईदर्शनास परवानगी द्यावी, तसेच दरवर्षी नाताळच्या सुट्टीत व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी नाताळ सणापासून म्हणजेच २५ डिसेंबर ते १ जानेवारी या सप्ताहात शिर्डीमध्ये साईभक्तांची मोठी गर्दी होणार आहे.या साईभक्तांना सुलभ दर्शन , भोजन व अन्य सुविधा देण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीचा त्रास साईभक्तांना होवून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी नाताळ सप्ताह काळात शिर्डीकडे येणारी वाहतूक बाह्य मार्गाने वळवावी. तसेच गर्दीचा फायदा घेवून अनुचित प्रकार घडू नये व साईभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची जादा कुमक वाढवावी असे साई संस्थान अध्यक्ष आशुतोष काळे यांनी मागणी पत्रकात म्हटले आहे.