सहकारातून समृद्धी साधत शंकरराव कोल्हे यांनी अध्यात्माची ध्वजाही फडकत ठेवली-विवेक कोल्हे

सहकारातून समृद्धी साधत शंकरराव कोल्हे यांनी अध्यात्माची ध्वजाही फडकत ठेवली-विवेक कोल्हे

Prospering through cooperation, Shankarrao Kolhe kept the flag of spirituality flying: Vivek Kolhe

युवापिढीने जनार्दन स्वामींचे कार्य अभ्यासून प्रेरणा घ्यावीThe youth should be inspired by studying the work of Janardhan Swami

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 19.20Pm.

कोपरगाव : राष्ट्रसंत जनार्दन स्वामी व माजीमंत्री शंकरराव कोल्हे या द्वयीचे संबंध जिव्हाळ्याचे होते.कोपरगांवच्या भुमिला ऐतिहासिक, धार्मिक वारसा आहे.सहकारातून समृद्धी साधत शंकरराव कोल्हे यांनी आश्रमाचे अध्यक्ष स्व. मोहनराव चव्हाण यांचे माध्यमांतून अध्यात्माची ध्वजाही फडकत ठेवली असल्याचे गौरवोद्गार कोईमतूर ऊस संशोधन संस्थेचे उपाध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने संत जनार्दन स्वामी यांच्या ३२ व्या पुण्यतिथी कार्यक्रमात संत पूजन व विश्वस्तांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.

विवेक कोल्हे म्हणाले, राष्ट्रसंत जनार्दन स्वामींनी अतिशय सोप्या भाषेत परमार्थ शिकवला व जपानुष्ठान सोहळा सुरुवात करत त्याची उंची विशिष्ट स्थानापर्यंत नेऊन ठेवली आहे, युवापिढीने जनार्दन स्वामींचे कार्य अभ्यासावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी असेही ते म्हणाले.

याप्रसंगी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्त त्र्यंबक पाटील, रामकृष्ण कोकाटे, अनिल जाधव, आशुतोष पानगव्हाणे, सुभाष शिंदे, संदीप चव्हाण, अतुल शिंदे कामगार नेते मनोहर शिंदे, सतीश आव्हाड, आदी उपस्थित होते, शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page