डिजिटल इंडिया कडे कोल्हे कारखान्याची वाटचाल – विवेक कोल्हे

डिजिटल इंडिया कडे कोल्हे कारखान्याची वाटचाल – विवेक कोल्हे

The journey of the Kohle factory to digital India – Vivek Kolhe

ऊस वाहतूकदारांना स्मार्टकार्डद्वारे डिझेल हे एक पाऊलDiesel is a step towards sugarcane transporters through smart cards

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 19.30Pm.

कोपरगांव: संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत व सुवर्ण शुगरकेन ट्रान्सपोर्ट च्यावतीने पारदर्शकता व विश्वासार्हता जपण्यासाठी जिल्हयात सर्वप्रथम उस वाहनात स्मार्टकार्डद्वारे डिझेल भरले याची माहिती मुळ मालकांना काही क्षणार्धात भ्रमणध्वनीद्वारे समजणार आहे. हे तंत्रज्ञानावर आधारीत डिजिटल इंडियाकडे एक पाउल असल्याचे वक्तव्य तज्ञ संचालक विवेक कोल्हे यांनी  केले. यावेळी बॉयलर व उत्पादन विभागातील आवश्यक ठिकाणी ॲटोमायझेशन करून हा कारखाना देशात सगळयाच बाबतीत अग्रेसर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. याप्रसंगी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक शिवाजीराव वक्ते, सोपानराव पानगव्हाणे, फकिरराव बोरनारे, निवृत्ती बनकर, प्रदिप नवले, वेणुनाथ बोळीज, अशोकराव औताडे, बाळासाहेब नरोडे, अशोकराव भाकरे, अमृतचे अध्यक्ष पराग संधान, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मानद कार्यकारी संचालक बापूसाहेब औताडे, एच.आर.मॅनेजर प्रदिप गुरव, कामगारनेते मनोहर शिंदे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, सी. एन. वल्टे, कामगार कल्याण अधिकारी एस. सी. चिने, सुरक्षा अधिकारी रमेश डांगे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, केनयार्ड विभागाचे दिपक जगताप, संगणक विभागाचे प्रमुख रमाकांत मोरे, हेडटाईमकिपर प्रविण गिरमे पेट्रोलपंप विभागाचे सागर नेहे, स्वच्छता विभागाचे परमेश्वर खरात यांच्यासह विविध खातेप्रमुख उपखातेप्रमुख, अमृत सुवर्ण संजीवनी शुगरकेन संस्थेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, शेतकरी सभासदांच्या उस प्लॉटचे सर्वेक्षण उपग्रहाद्वारे, गाळपासाठी तुटून येणा-या उसाचे वजन मनुष्यविरहीत काटयाद्वारे करून त्याची अद्यावत माहिती त्याच क्षणाला संबंधीतांच्या भ्रमणध्वनीवर संदेशाद्वारे पाठविण्यांच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देवुन त्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली आहे.स्पर्धेचे युग असुन त्यात वेगाने तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे, काळानुरूप त्याच्याशी सांगड घालुन मार्गक्रमण करणारा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांने देशात व राज्यात साखर कारखानदारीचे प्रत्येक पायलट प्रकल्प सर्वप्रथम येथे राबवुन त्याचा नांवलौकीक निर्माण केला आहे आणि भविष्यातील सर्व आव्हानांना कोल्हे कारखाना त्याच सक्षमपणे तोंड देवुन यशस्वी मार्गक्रमण करेल असेही ते शेवटी म्हणाले,

उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page