कोपरगाव च्या पाण्याबाबत कुदळे यांचे दुटप्पी वक्तव्य हास्यास्पद-रोहोम

कोपरगाव च्या पाण्याबाबत कुदळे यांचे दुटप्पी वक्तव्य हास्यास्पद-रोहोम

Kudale’s double statement about Kopargaon’s water is ridiculous

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 19.40Pm.

कोपरगाव: पाच नंबर साठवण तळ्याबाबत कोल्हे गट संभ्रम निर्माण करीत आहे हे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे कोपरगावच्या पाण्याबाबत दुटप्पी वक्तव्य हास्यास्पद असल्याची टिका भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे .

साहेबराव रोहम यांनी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि त्यांचे समर्थक शहर व ग्रामीण भागाच्या पाण्याबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोयीनुसार वेगवेगळी वक्तव्ये करीत आहेत. निळवंडेतुन शहरांला शुद्ध पाणी प्यायला मिळेल तर वाचलेले दारणाचे पाणी शेतीला मिळेल हे सुज्ञ मतदारांनी अगोदर जाणून घ्यावं. बाजारपेठेसही उर्जितावस्था येईल, या गोष्टीकडे विरोधकांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जातेय. १२० कोटी मंजूर झाले म्हणतात पण त्यासाठी बारा कोटी लोक वर्गणी आणायची कोठून ? हे मात्र सांगत नाहीत. याउलट निळवंडे योजना मंजूर करून तत्कालीन युती सरकारने २६ कोटी रुपये एवढी रक्कम नगरपरिषदेला माफ केली आहे. पिण्याच्या पाणी योजनेबाबत कोणत्याही योजनेला विरोध असण्याचे काही कारण नाही,

कोपरगाव नगरपालिका पिण्याच्या पाण्याची साठवण तळ्यासाठी शंकरराव कोल्हे यांच्या प्रयत्नांनीच जमिनी प्राप्त झाल्या आहेत. ४३ कोटीचे पाणी योजना बिपिन कोल्हे यांच्या प्रयत्नातून झाली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडे शिर्डी कोपरगाव योजना मंजूर करून घेतली आहे. कोपरगाव शहराबरोबरच शेतक-याला पाणी मिळावं म्हणुन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने प्रयत्न करत संघर्ष केला. हा इतिहास आहे.तसा झारीतले शुक्राचार्य होऊन विरोधकांनी त्यात सातत्याने अडथळे आणले हा ही इतिहास आहेच की, तेंव्हा आमदार काळे यांनी याच्या त्याच्या आडून खोटे आरोप करण्यापेक्षा आधी निळवंडे बाबतची भूमिका स्पष्ट करावी , त्यानंतरच साठवण तलाव क्रमांक ५ बाबतची भूमिका मांडावी असे आवाहन साहेबराव रोहोम शेवटी म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page