२८ कामातील भ्रष्टाचाराचा आमदारासमोरील स्व: कबुलीचा गंगुलेंना विसर पडला काय? – पाठक
28 Did Ganguly forget his confession in front of the MLA about corruption in work? – Pathak
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir17 Dec.2021 19.50Pm.
कोपरगाव : आम्ही त्या अठ्ठावीस कामांना न्यायालयातून स्थगिती घेतली ही बाब सत्य आहे. पण त्यामुळे जनतेचे अडीच कोटी रुपये वाचले हे तितकेच सत्य आहे की,. परंतु एका कार्यक्रमात आमदार आशुतोष काळे यांच्या समोर जाहीरपणे त्या २८ कामात भ्रष्टाचार असल्याच्या स्व: कबुलीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले यांना विसर पडला काय? असा उपरोधिक सवाल भायुमो चे शहराध्यक्ष अविनाश पाठक यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
पाठक पुढे म्हणाले, आमचा सर्व २८ कामातील केवळ सहा कामांना विरोध होता व त्या कामातून जनतेचे अडीच कोटी रुपये वाचविले ते वाचलेले अडीच कोटी दुसऱ्या कामासाठी उपयोगी पडले या सत्याची विरोधकांना जाणीव आहे. मात्र जनतेसमोर विरोधक खोटे पडल्याने “गीरे तो भी टांग उपर” अशी यांची गत झालेली आहे.
पाठक पुढे म्हणाले,विरोधकांना कोपरगाव शहरातील जनतेच्या पाण्याची व बाजारपेठेची काळजी असती तर त्यांनी काही लोकांना न्यायालयात पाठवून निळवंडे पाईपलाईन योजनेला विरोधच केला नसता. शहरात आलं की पाणी या विषयावर वेगळी भूमिका मांडायची आणि निळवंडे कार्यक्षेत्रात गेल्यावर निळवंडेचे पाणी मी कोपरगाव शहरासाठी जावू देणार नाही अशी सोयीस्कर दुटप्पी भूमिका लोकप्रतिनिधी व त्यांचे बगलबच्चे मांडत आहेत.
विद्यमान आमदार हे आता साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष झाले आहेत. पाच नंबर तळेही झाले पाहिजे व निळवंडेचे पाणीही आले पाहिजे ही आमची व शहरातील जनतेचीही भूमिका आहे,आता त्यांनी ही योजना पूर्ण होण्यासाठी ठामपणे प्रयत्न केले पाहिजेत,तसं ५ नंबर तळे व निळवंडेचे असे दोन्ही कडील पाणी आलं पाहिजे, असे केव्हा बोलणार ? असा सवाल शेवटी अविनाश पाठक यांनी पत्रकातून केला आहे