कोपरगाव च्या बाजारात गुणकारी शिंगाडा फळे विक्रीस

कोपरगाव च्या बाजारात गुणकारी शिंगाडा फळे विक्रीस

Selling Singhada fruits in Kopargaon market

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 24 Dec.2021 14.2.0Pm.

कोपरगाव:येथील मार्केटमध्ये थंडीच्या मोसमात शिंगाडेफळ दिसू लागले आहे शिंगाड्याच्या खास चवीमुळे लोकही ते आवडीने खातात. मात्र या शिंगाड्याचेही अनेक गुणकारी फायदेही असून दम्याच्या रुग्णांनी शिंगाडा खाणे योग्य मानले जाते.

या गुणकारी फळा पासून दम्याला चांगला आराम मिळतो. मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर शिंगाडा फायदेशीर आहे, शिंगाडा खाल्ल्याने पायाच्या तळव्यांच्या भेगा भरुन येतात. तसेच शरीराच्या एखाद्या भागावर सूज आल्यास त्यावर शिंगाड्याचा लेप लावल्यास फायदा होतो.शिंगाड्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.  गर्भवती महिलेंनी शिंगाडा खाल्ल्यास महिला आणि बाळ दोघांचे स्वास्थ्य चांगले राहते. तसेच गर्भपाताचा धोकाही कमी होतो. शिंगाडा खाल्ल्याने पाळीसंबंधित समस्याही दूर होतात.  शिंगाड्याच्या सेवनाने रक्तसंबंधित समस्या दूर होतात. जुलाब झाल्यास शिंगाड्याच्या सेवनाने फायदा होतो.शिंगाडा खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. यामुळे उपवासात शिंगाड, शिंगाड्याचे पीठ खाल्ले जाते. असे या शिंगाडे विक्रेत्यांनी सांगितले.                    शिंगाड्याची ही फळे भाजी बाजारात तसेच रस्त्यांवर हातगाड्यांवर मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेली आहे. आवळे ओली हळद आल तसेच हिरव्यागार पालेभाज्या यांचीही रेलचेल मोठी आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page