भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त फळझाडांचे रोपण

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त फळझाडांचे रोपण

Planting of fruit trees on the occasion of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee’s birth anniversary

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 25 Dec.2021 17.50Pm.

कोपरगावचे : जेष्ठ नागरिक व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा दिर्घ सहवास लाभलेले स्नेही टेकचंद खुबाणी व सुधाप्पा कुलकर्णी यांचे शुभहस्ते सिध्दकला नगर येथील उद्यानात फळझाडाचे वृक्षारोपण करून पालकत्व देण्यात आले.

या प्रसंगी योग शिक्षिका सौ.वृंदा को-हाळकर, दिलीप गिरमे, राजेंद्र कोयटे, अतुल कोताडे, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, सोपानराव भालेराव, सदाभाऊ साटोटे आदिंसह वृक्षप्रेमी उपस्थित होते. सूर्यतेज संस्थेच्या वतीने सिद्धकला नगर उद्यानात आंबा, सिताफळ,रामफळ, जांभूळ, अंजीर, बदाम,आवळा,पेरु,चिकू यासह विविध फळझाडे लावण्यात आली आहे.या झाडांचे पालकत्व देण्यात आले आहे. कोपरगांव शहरात फळ झाडांचे उद्यानाला उपस्थितांनी व वृक्षप्रेमींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page