वारी ग्रामस्थांकडून आमदार आशुतोष काळे यांचा सत्कार
MLA Ashutosh Kale felicitated by Wari villagers
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 26 Dec.2021 17.50Pm.
कोपरगाव : अनेक वर्षापासूनचा गोदावरी नदीवरील वारी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २० कोटी निधी दिला,तसेच वारी-कान्हेगाव पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न सोडविला त्याबद्दल वारी ग्रामस्थांनी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले, मागील दोन वर्षात प्रतिकूल परिस्थिती असतांना देखील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निधी आणुन अत्यंत महत्वाचे प्रश्न सोडविता आले याचे मोठे समाधान आहे.नागरिकांच्या विकासाच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मतदार संघाच्या विकासाचे अनेक प्रश्न यापुढील काळात मार्गी लावणार आहे. असे त्यांनी सांगीतले.
पं. स. सदस्य मधुकर टेके म्हणाले,वारी गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून ते खासदारकीच्या निवडणुकी पर्यंत अनेक निवडणुकांच्या प्रचारादरम्यान अनेक नेत्यांकडून वारी पुलाचा प्रश्न मार्गी लावु अशी आश्वासने दिली गेली. मात्र वारी पुलाचा प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार अशोक काळे वगळता कुणाकडूनही प्रयत्न झाले नाही. आ. आशुतोष काळे यांनी वारीच्या पुलासाठी २० कोटी रुपये निधी देवून वारीकरांनी पाहीलेले स्वप्न सत्यात उतरविले आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, नानासाहेब टेके, सुखदेव मुसळे, संजय जाधव, दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब मलिक, रमेश मलिक, भगवान पठाडे, रमेश कोकाटे, भास्करराव आदमाणे, अशोक मलिक, सुंदरराव जाधव, मिनीनाथ नरोडे, बबलू गडाख आदी उपस्थित होते.