महामार्गासाठी जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवा – आ. काळे
Lands lost for highways, solve the problems of those farmers -Mla.Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 26 Dec.2021 18.00Pm.
कोपरगाव: समृद्धी महामार्ग व एन. एच. १६० महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी प्रशासकीय मुख्य अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयातील बैठकीत दिल्या.
बैठकीस प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप गाडे, दहीफळे,पाटबंधारे विभागाचे गायकवाड, ससाणे, पोळ, भूमी अभिलेखचे अवचरे, गायत्री कन्स्ट्रक्शनचे सुमेध वैद्य उपस्थित होते.
आ.आशुतोष काळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले की, समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी एन.एच. १६० महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्याबाबतीत येत असलेल्या अडचणी दूर करून त्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा सरकार कडील अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्न करतो . कोरोना संबंधीच्या नवीन सूचनांचे काटेकोर पालन करून अंमलबजावणी करा, पण नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या असेही त्यांनी सांगीतले.
यावेळी जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, मेहमूद सय्यद, सुधाकर होन, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, सागर लकारे, सर्व ग्रामसेवक आदी उपस्थित होते.