लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारकाची मुहूर्त मेंढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली- विवेक कोल्हे
Moment of Lokshahir Annabhau Sathe Memorial by Shev Shankarrao Kolhe – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 26 Dec.2021 18.20Pm.
कोपरगांव : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी उपेक्षित समाजाच्या व्यथा सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत साहित्यकृती सातासमुद्रापार नेली. त्या लोकशाहीर यांचे स्मारक कोपरगावात असावे याची मुहूर्तमेढ माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी रोवली असल्याची आठवण यावेळी येत असल्याचे उद्गार औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी रविवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कोपरगाव शहरातील आगमन प्रसंगी स्वागत करताना व्यक्त केले.त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले असेही ते म्हणाले,
जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी स्वागत करत विधीवत पुजन केले.
याप्रसंगी साईबाबा कॉर्नर ते अण्णाभाऊ साठे पुतळा पर्यंत पिवळ्या रंगाचा गुलाल उधळून मिरवणूक काढण्यात आली होती., असंख्य समाजबांधव यात सहभागी झाले होते.
या प्रसंगी गटनेते रवींद्र पाठक, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय पवार, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, विनोद राक्षे, जितेंद्र रणशूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, कैलास खैरे, वैभव गिरमे, रवींद्र रोहमारे, सोमनाथ म्हस्के, अँड. नितीन पोळ, दिनेश कांबळे, दिपक जपे, सुशांत खैरे, रवींद्र शेलार, अनिल जाधव, राजेंद्र बागुल, शरद त्रिभुवन, संजय तूपसैंदर,.जयवंत मरसाळे, खालीक भाई कुरेशी, प्रशांत कडू, आदिंसह भाजपा-मित्रपक्ष आजी-माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.