कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या -आ.आशुतोष काळे

कोपरगाव नगरपरिषदेची सत्ता द्या -आ.आशुतोष काळे

Give power to Kopargaon Municipal Council – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 27 Dec.2021 18.20Pm.

कोपरगाव : राजकारण निवडणुकीपूरतेच करायचे ही काळे परीवाराची परंपरा आहे. हे शहरातील जनतेने पाहिले आहे. विकास हा एकच माझा अजेंडा असून शहरातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कोपरगाव नगररिषदेची सत्ता द्या असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी शनिवारी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील १ कोटी रुपये निधीच्या अमरधाम नूतनीकरण व सुशोभीकरणप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विजय वहाडणे होते.

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, सौ. वर्षा शिंगाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, रायुकॉंचे नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, सौ. रेखा जगताप, रमेश गवळी, फकीर कुरेशी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव नगरपरिषदेत बहुमताचा उपयोग शहरवासीयांना विकासापासून वंचित ठेवण्यासाठी वापरला गेला. जनतेचा रोष वाढल्यावर सत्ताधाऱ्यांनी विकासकामांना जरी सहमती दाखवीली मात्र त्यावेळी वेळ निघून गेली होती व विकास कामांसाठी निधी असतांना देखील नागरिकांना हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या होत्या.यापुढे ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून द्या विकासाच्या बाबतीत शहराचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

यावेळी ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२० कोटी रुपयांची तांत्रिक मंजुरी आणल्याबद्दल प्रभागातील महिलांनी आ.आशुतोष काळे यांचे औक्षण करून सत्कार केला.

यावेळी विजय वहाडणे यांनी विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना व विकासाला आडवे येणाऱ्यांना नागरिकांनी येत्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत धडा शिकवावा असे आवाहन केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page