तिळवणी शिरसगांव बाजार उपकेंद्रासाठी शेतकऱ्याकडून सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडे पाणी व विजेची मागणी
For Tilvani Shirasgaon market sub-center, Mrs. Demand for water and electricity from Snehalta Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 27 Dec.2021 18.30Pm.
कोपरगांव: कोपरगांव तालुका कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तिळवणी शिरसगांव बाजार उपकेंद्र सुविधा सुरू झाल्याने पुर्व भागातील तसेच बाहेरगांवच्या शेतक-यांना शेतमाल विकीसाठी चांगली सुविधा उपलब्ध प्राप्त झाली असून याठिकाणी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी व रात्रीसाठी वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडे केली.
कोपरगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील तिळवणी शिरसगांव येथे उपकेंद्र सुरू करण्यांत आले असुन येथे शेतक-यांनी मोठया प्रमाणांत कांदा विक्रीसाठी आणला असुन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी या बाजार उपकेंद्रास नुकतीच भेट देवुन पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधला, त्या वेळी शेतकर्यांनी त्यांच्या कडे पाणी व वीज या अडचणी मांडल्या .
प्रारंभी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव निकम यांनी प्रास्तविक केले. रेवण निकम यांनी सौ. स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार केला.
सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व येथील उणीवा दुर करुन शेतकऱ्यांना सोयी सुविधा देण्याबाबत सुचना केल्या. याप्रसंगी सर्वश्री हेमंत निकम, दादाभाऊ शिंदे, राजेश मोरे, रविंद्र निकम, ज्ञानेश्वर निकम, प्रभाकर उकीर्डे, नासिर पठाण, सोनु पटेल, आण्णा भुजाडे, संतोष काळे, निलेश सोनवणे आदि उपस्थित होते.