लोकशाहिर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे आमदार काळे यांच्याकडून स्वागत
Welcome to the statue of Lokshahir Annabhau Sathe by MLA Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 27 Dec.2021 18.40Pm.
कोपरगाव : शहरात रविवार (दि.२६) रोजी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या उत्साहात आगमन झाले असता श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्रपणे अभिवादन करून स्वागत केले.
यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोपरगावात आल्याचा मनस्वी खूप आनंद होत आहे. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून समाजातील दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी बांधवांच्या जगण्याचे वास्तव मांडले.समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राज्यात वैचारिक, समाजिक, साहित्यिक क्रांती घडवण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. तमाशा कलेला लोकनाट्य कलेची प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सुनिल शिलेदार, राष्ट्रवादीयुवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निखिल डांगे, कृष्णा आढाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.