कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारीच आता प्रशासक
The head of Kopargaon municipality is now the administrator
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tur 28 Dec.2021 15.00Pm.
कोपरगाव : कोरोनाच्या काळात निवडणुका पुढे ढकलल्यामुळे उद्या बुधवार (२९) पासून कोपरगाव नगरपालिकेवर मुख्याधिकारी शांताराम गोसावी हेच प्रशासक नेमण्यात आले आहेत. त्यासाठी नगरविकास खात्याकडून मुख्याधिकार्यांना पदाचा कार्यभार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक प्रत्येक नगरपालिकेला देण्यात आले आहे.
त्यामुळे आता विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल पालिका प्रशासन प्रशासक हाती जाणार असून निवडणूक होईपर्यंत हा कार्यभार घेणार आहेत.कोपरगावात तर नगरपालिकेतील नगराध्यक्ष व नगरसेवक याची मुदत ही २९ डिसेंबर ला संपत होती. मात्र आणखी काही दिवस कालावधी वाढवून मिळेल अशी आशा विद्यमान नगराध्यक्ष व नगरसेवक यांना होती. पण एकही दिवस वाढला नसून बुधवारी (२९) ला कोपरगावातील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यभार समाप्त झाला आहे. उद्या बुधवारपासुन कोपरगावचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी हे प्रशासक म्हणून आपण कार्यभार स्वीकारणार आहेत. कोपरगाव नगर पालिकेची मुदत संपली आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नगरविकास विभागाकडून सोमवारी रात्री उशिरा नगरविकास चे प्रधान सचिव मोहन पाठक यांच्या सहीनिशी हे परिपत्रक काढण्यात आले असून ते विभागीय आयुक्त यांना देण्यात आले. विभागीय आयुक्त यांनी त्याची तत्काळ अंमलबजावणी केली असून तसे आदेश कोपरगाव नगरपालिका यांना ही काढले आहेत. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोविड-१९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुकांकरिता निवडणूक प्रक्रिया वेळेवर पार पाडणे शक्य झाले नसल्याने व मुदत संपत असलेल्या स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकांची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने मुदत समाप्तीनंतर नागरी स्थानिक संस्थेमध्ये प्रशासक नियुक्ती करण्यात येत असते.
रेंगाळलेले सर्व विकासात्मक कामे मार्गी लावण्यात येणार-मुख्याधिकारी शांताराम गोसावी
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाचा कारभार प्रशासकाकडून हाकताना सुरू असलेली आणि रेंगाळलेले सर्व विकासात्मक कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.विकासकामांमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारे फटका बसणार नसल्याचे पालिका मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे सार्वत्रिक निवडणुक घेण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याने नगर विकास मंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे तशा प्रकारचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे एकूणच कोपरगाव पालिकेत प्रशासक नेमणूक झाल्यानंतर मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
श्री गोसावी म्हणाले, नव्या निकषानुसार कोपरगाव नगरपालिकेच्या नगरसेवकांची संख्या ३० इतकी असणार आहे. अद्याप पर्यंत प्रभाग रचना झालेली नाही, मात्र १५ प्रभाग असणार असून प्रत्येक प्रभागात दोन उमेदवार असणार आहेत. रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यात येणार आहेत तशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेही ते म्हणाले