समताच्या सोने तारण कर्जाला आली झळाळी; दीडशे कोटी कर्जाचा टप्पा पार – काका कोयटे

समताच्या सोने तारण कर्जाला आली झळाळी; दीडशे कोटी कर्जाचा टप्पा पार – काका कोयटे

Samta Gold Mortgage Debt Gains; Cross the debt stage of one and a half crore – Kaka  Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tur 28 Dec.2021 20.00Pm.

कोपरगाव : थोडीफार जोखीम असलेले सोने तारण कर्ज हे जगातील सर्वात सुरक्षित कर्ज असून अवघ्या दहा मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुविधांमुळे समताच्या सोने तारण कर्जाला  झळाळी आल्याने दीडशे कोटी कर्जाचा टप्पा पार करणारी समता पतसंस्था राज्यात नंबर एक वर असल्याचे गौरवोद्गार समता पत संस्थेचे संस्थापक चेअरमन काका कोयटे यांनी समता सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

यावेळी बोलताना काका कोयटे म्हणाले, मुळात सोनेतारण या मराठी धंद्यावर परप्रांतीय खाजगी कंपन्यानी अतिक्रमण करून पळविलेल्या हक्काचा व्यवसाय पतसंस्थाच्या कवेत यावा यासाठी  आम्ही सोने तारण व्यवसाय सुरू केला अल्पावधीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे खासगी कंपन्या कडून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखण्यात यश मिळाले मुळात पतसंस्थांचा उद्देश खाजगी सावकारशाही रोखणे हाच आहे, तो या माध्यमातून बहुतांशी प्रमाणात आम्ही साध्य केला आहे. काही ग्राहकांना सोने कर्ज घेण्यासाठी बँकेत येण्याची अडचण येते त्यांच्यासाठी लवकरच सोनेतारण कर्ज ची घरपोच ऑनलाईन सेवा सुरू करणार आहोत. सोने तारण  कर्जामध्ये ग्राहकाकडून खोटे सोने येण्याची मोठी जोखीम असते परंतु संस्थेला नेमलेल्या सुवर्णकाराची प्रामाणिक साथ असेल तर ही जोखीम कमी होते यासाठी आम्ही प्रत्येक शाखेत दरमहा तपासणी केली जाते ही तपासणी करताना कोपरगाव शाखेचा सुवर्णकार येवला शाखेतील तारण सोन्याची तपासणी करतो येवला शाखेतील सुवर्णकार वैजापूर शाखेतील सोन्याची वैजापूर शाखेचा सुवर्णकार राहुरी शाखेतील सोन्याची अशाप्रकारे प्रत्येक शाखेत कर्ज तारण सोन्याची पुर्न तपासणी केली जाते. आमचे संचालक संदीप कोयटे यांच्यासह काही जणांना आम्ही ऑनलाइन सोने तपासणीचे शिक्षण दिले आहे. अशी माहिती काका कोयटे यांनी यावेळी दिली.

प्रारंभी प्रास्ताविक करताना संचालक संदीप कोयटे म्हणाले सोनेतारण कर्ज मध्ये अठरा महिन्यांमध्ये आम्ही दीडशे कोटीचा टप्पा पार केला हा आमच्या दृष्टीने आज सुवर्णक्षण आहे. यात सर्वात मोठी भूमिका आमच्या सुवर्णकार यांची असून त्यांच्या विश्वासावरच १५ हजार ५०० ग्राहकांना एवढे मोठे कर्ज वितरण करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेसाठी समता पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल जितु भाई शहा एकनाथ शिरोडे, गुलशन होडे जनरल मॅनेजर सचिन भट्टड,असि.जनरल मॅनेजर (वसुली विभाग)  जनार्दन कदम, ॲड. विजय गवांदे समता पत संस्थेचे कर्मचारी हजर होते.

याप्रसंगी केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. समताच्या सोनेतारण विभागाचे प्रमुख  विवेक नगरकर,  कैलास कवाडे,  विशाल ठोळे यांचा सत्कार समताचे जेष्ठ संचालक  जितुभाई शहा,  अरविंद पटेल,  चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच सोनेतारण व्हॅल्यूअर  अनिल जाधव,  आनंद भडकवाडे,  सुरज वडनेरे यांचाही सत्कार करण्यात आला.

चौकट

स्थावर मालमत्तेवर दिलेल्या कर्जाच्या थकबाकी वसुलीसाठी १०१ किंवा १५६ चे दाखले काढावे लागतात त्याच्या नोंदी होत नाही. अनेकदा कर्जदार आम्ही कर्ज घेतलेच नाही आम्हाला फसवणूक करून आमच्या सह्या घेतल्या, अशा अनेक तक्रारी करतात त्यामुळे संचालकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो, त्याचा मनस्ताप भोगावा लागतो, त्या तुलनेत सोने तारण कर्ज हे सामान्य व मध्यमवर्गीय कर्जदारांची तातडीची निकड पूर्ण होऊ शकते. तसेच बॅंकांना देखील कर्ज बुडीत जाण्याचा कोणताच धोका नसल्यामुळे सोने तारणसाठी तत्काळ कर्ज देतो. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही पण निर्धास्त झालो आहोत तीस टक्के सोने तारण कर्ज वाटप केले आहे ते सर्व सुरक्षित आहे -काका कोयटे

Leave a Reply

You cannot copy content of this page