संजीवनी  अकॅडमीत माय ओन स्टोरी बुकचे प्रदर्शन

संजीवनी  अकॅडमीत माय ओन स्टोरी बुकचे प्रदर्शन

Exhibition of My Own Story Book at Sanjeevani Academy

  विद्यार्थ्यांनी  बनावे भविष्यातील  लेखकStudents should become future writers

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 29 Dec.2021 19.00Pm.

कोपरगांव: सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टीने  संजीवनी अकॅडमी मध्ये स्कूलच्या संचालिका सौ मनाली अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणुन संजीवनी अकॅडमीच्या विध्यार्थ्यांना  दिवाळीच्या सुट्टीत इंग्रजी मधुन स्वतः तयार केलेल्या गोष्टीचे  पुस्तक तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. आलिकडेच विद्यार्थ्यांनी  लिखाण केलेल्या ‘माय ओन स्टोरी बुक’चे प्रदर्शन  भरविण्यात आले होते,

असे स्कूलच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या प्रदर्शनास  सौ. कोल्हे यांच्यासह दंतरोग तज्ञ डाॅ. प्रियंका कुणाल कोठारी, प्रसिध्द संगीत शिक्षक  श्री केतन कुलकर्णी व त्यांच्या पत्नी सौ. दिपाली कुलकर्णी, पालक, डायरेक्टर प्रिन्सिपाल सौ. सुदरी सुब्रमण्यम, प्रिन्सिपाल सौ. शैला  झुंजारराव, हेड मिस्ट्रेस सौ. माला मोरे, शिक्षक   उपस्थित होते. सदर प्रसंगी संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजची विद्यार्थिनी सुरभी केतन कुलकर्णी हिची इंडियन आयडाॅलमध्ये टाॅप १४ मध्ये निवड झाल्याबध्दल तिचे पालक श्री व सौ. कुलकर्णी यांचा विशेष  सत्कार करण्यात आला. पत्रकात पुढे म्हटले आहे की वाचन, लिखाण, ऐकणे, बोलणे इत्यादी बाबींमधुन विद्यार्थ्यांमधील भाषा  कौशल्य, शब्द संचय, विविध वाक्य बनविण्याची हातोटी व सृजनशिलता वाढीस लागल्याची सिध्दता मिळाली आहे. आपापल्या पुस्तकातील प्रस्तावना, आभार, प्रसंगानुसार चित्र, संवाद, इत्याइी बाबींची सुंदर मांडणी विद्यार्थ्यांनी  केली आहे. सदर प्रदर्शनातून  पंचांनी उत्कृष्ट  पुस्तकांची निवड केली. त्या सर्व विध्यार्थ्यांना  मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. पालकांनी सदर उपक्रमाचे स्वागत करून आंनद व्यक्त केला. 

Leave a Reply

You cannot copy content of this page