संजीवनी अकॅडमी  बेसबॉल संघाला एमएलबी इंडिया कप २०२१चे  कांस्य पदक  – सौ मनाली कोल्हे

संजीवनी अकॅडमी  बेसबॉल संघाला एमएलबी इंडिया कप २०२१चे  कांस्य पदक  – सौ मनाली कोल्हे

MLB India Cup 2021 Bronze Medal for Sanjeevani Academy Baseball Team – Mrs. Manali Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 1Jan.2022 19.00Pm.

 कोपरगांव: संजीवनी अकॅडमीच्या बेसबाॅल संघाने गुडगाव, हरियाणा येथे संपन्न झालेल्या युएसए प्रायोजीत मेजर लिग बेसबाॅल (एमएलबी) इंडिया कप २०२१ मध्ये सहभाग नोंदवुन कांस्य पदकाची कमाई करून संजीवनी अकॅडमीने पुन्हा एकदा देशाच्या क्रीडा क्षेत्रात आपले नाव अधोरेखित केले आहे, अशी माहिती स्कूलच्या संचालिका सौ मनाली अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

सौ मनाली कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, एमएलबी इंडिया कप २०२१ साठी ९ ते ११ वयोगटातुन देशातील विविध शाळांमधिल १२ संघांची निवड करण्यात आली. यात संजीवनी अकॅडमी बेसबॉल संघाची निवड ही मोठी उपलब्धी होती. त्यात संजीवनी अकॅडमीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई करून स्कूलच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. संजीवनी अकॅडमीच्या संघात ९ ते ११ वर्षे वयोगटातील स्वरीत मनोज गोलेचा, कृष्णा निलेश बागुल, सर्वेश तुषार शेळके, आर्यन नितीन नारखेडे, जय तरूण भुसारी, श्रेयश अमोल सानप, शाहू प्रसादकुमार निकम, नील विकास काटे, वेदांत परेश आढाव, रघुनाथ विनोद लोंगाणी, निर्भय रूपेश पारख व देवेश कारभारी मालकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.या सर्व खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक विरूपक्ष रेड्डी व असिस्टंट कोच तुषार एरंडे यांचे मार्गदर्शन लाभले. सामने झाल्यावर या सर्व खेळाडूुना एमएलबी आशिया पॅसिफिक क्षेत्राचे बेसबाॅल डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर रीक डे यांचे हस्ते कांस्य पदक प्रदान करण्यात आले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या सर्व खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी विरूपक्ष रेड्डी, पिन्सिपाल शैला झुंजारराव, अजित सदावर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय पातळीवरील यशाबध्दल इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, संचालिका सौ. मनाली कोल्हे यांनीही सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page