संजीवनी इंजिनिअरींग व फार्मसी महाविद्यालय अटल रॅन्कने सन्मानित- अमित कोल्हे
Sanjeevani College of Engineering and Pharmacy honored with Atal Rank – Amit Kolhe
नवकल्पना व उद्योजकता विकास उपलब्धी बाबत भारत सरकारकडून दखलGovernment of India addresses innovation and entrepreneurship development achievements
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 1Jan.2022 19.20Pm.
कोपरगांव: अटल रॅन्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस् (एआरआयआयए- नवकल्पना उपलब्धी नुसार संस्थांची अटल रॅन्किंग) हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रम आहे. आखिल भारतीय तंत्र शिक्षण परीषद (एआयसीटीई) आणि शिक्षण मंत्रालयांच्या इनोव्हेशन सेलच्या माध्यमातुन भारतातील सर्व प्रमुख उच्च शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांनी विद्यार्थी आणि प्राद्यापकांमध्ये इनोव्हेशन आणि एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (नवकल्पना आणि उद्योजकता विकास) च्या समर्थनार्थ काय उपक्रम राबविले, यातुन काय निष्पन्न झाले, हे तपासुन यशस्वी संस्थांना अटल रॅन्क बहाल करून गौरविले जाते. यात संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज व संजीवनी फार्मसी काॅलेज या दोनही संस्थांना ‘बॅन्ड प्राॅमिसिंग’ या वर्गवारी मध्ये भारत सरकारकडून अटल रॅन्किंग प्राप्त झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
अमित कोल्हे यांनी म्हटले आहे की, अटल रॅन्किींगसाठी केंद्र सरकार, सरकारी स्वायत्त संस्था, राज्य सरकार, खाजगी स्वायत्त संस्था व खाजगी विनाअनुदानित संस्था अंतर्गत वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये संस्थांना मानकांप्रमाणे कसोट्यांना सामोरे जावे लागते. देशात एआयसीटीई, नवी दिल्लीच्या अखत्यारीत देशात खाजगी विनाअनुदाणित संस्थांमध्ये २५३९ इंजिनिअरींग काॅलेजेस व १४६७ फार्मसी काॅलेजेस आहेत. मात्र फारच कमी संस्था ज्यांच्याकडे नवकल्पना आणि उद्योजकता विकासाच्या समर्थनार्थ उपक्रम राबविले जातात, अशा संस्था अटल रॅन्किंगसाठी अर्ज करतात. संजीवनीच्या दोनही संस्थांमध्ये यासाठी प्रयत्न केले जातात, त्यामुळे संजीवनीच्या दोनही संस्था अटल रॅन्किंगच्या कसोट्या सहजा सहजी पार करू शकल्या. संजीवनी इंजिनिअरींग व फार्मसी काॅलेजने आत्तापर्यत भारत सरकारच्या अनेक स्पर्धा व उपक्रमांमध्ये भाग घेवुन दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर यश प्राप्त केले आहे. आता अटल रॅन्किगच्या प्राप्ती मुळे संजीवनीच्या शिरेपेचात अधिकचा एक मानाचा तुरा खोवला गेला आहे, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.
‘अटल रॅन्किंग’ च्या उपलब्धी बाबत माजी मंत्री व इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून इंजिनिअरींग व फार्मसी काॅलेजचे डायरेक्टर्स अनुक्रमे डाॅ. ए. जी. ठाकुर व डाॅ. किशोर साळुंखे, तसेच दोनही महाविद्यालयांतील प्राद्यापकांचे अभिनंदन केले.