समता पतसंस्थेचे यश सहकार क्षेत्राला दीपस्तंभासारखे – शांताराम गोसावी,

समता पतसंस्थेचे यश सहकार क्षेत्राला दीपस्तंभासारखे – शांताराम गोसावी,

Success of Samata Patsanstha is like a beacon to the co-operative sector – Shantaram Gosavi,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 3Jan.2022 19.20Pm.

कोपरगाव : समता पतसंस्थेचा सहकार क्षेत्रात अगरबत्ती व कापूर उत्पादनातून सुगंध दरवळणार आहे. काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक दृष्टीने एक विशिष्ट पद्धतीला फाटा देवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उंच उंच अशी उड्डाणे घेणाऱ्या समता पतसंस्थेचे यश सहकार क्षेत्राला दीपस्तंभासारखे असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्व.मोहनलाल झंवर सभागृहात समता दिनदर्शिका २०२२ प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी तहसिलदार विजय बोरुडे होते.

यावेळी तहसीलदार बोरुडे म्हणाले, कोपरगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून कोपरगावातील व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून भविष्याच्यादृष्टीने शहराबरोबरच ग्रामीण भागातील व्यावसायिक समृद्ध कसे होतील यासाठी लवकरच समृद्धी महामार्गाचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे नियोजन केले जाईल. व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन काका कोयटे यांनी प्रास्ताविक करताना समता दिनदर्शिका ५ जिल्ह्यातील १ लाख घरात जाऊन पोहचते त्यातुन संस्थेचे उपक्रम सभासद, हितचिंतकापर्यंत पोहोचवून सभासदाशी असलेले नाते अधिक घट्ट करत असते. तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी फॉरेन्सिक ऑडीट कंट्रोल रूम, ऑनलाईन समता रिकव्हरी पॅटर्न, सोनेतारण विभागाची कार्यप्रणाली समजून घेतली. सहकार मंदिरातील अगरबत्ती ,कापूर,कापसाची वाती, वस्त्र निर्मिती अशा विविध सुरु असलेल्या उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी ज्ञानेश्वर चाकणे,संचालक  कचरू मोकळ, गुलशन होडे, किरण शिरोडे, प्रदीप साखरे, नगरसेवक जनार्दन कदम यांच्यासह समता पतसंस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन एच.आर. श्रीमती उज्वला बोरावके यांनी तर प्रदीप साखरे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page