संत जगनाडे महाराजांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला– आशुतोष काळे

संत जगनाडे महाराजांनी संत तुकारामांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला– आशुतोष काळे

Saint Jagannade Maharaj gave the world an invaluable collection of literature of Saint Tukaram – Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 2Jan.2022 19.20Pm.

कोपरगाव: महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. संतानी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले. संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले होते. श्री संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त केले.

आ.काळे म्हणाले की, तेली समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून श्री संत जगनाडे महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे. भविष्यात देखील निधीची गरज भासल्यास निधी देवू अशी ग्वाही दिली. यावेळी सुधाकरराव रोहोम, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक मंदार पहाडे, सुनील शिलेदार, तेलीसमाज जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, राहुल देवळालीकर, आदींसह तेली समाज बांधव व नागरिक कोरोनाचे नियम पाळून उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page