कोरोनाच्या गडद छायेखाली ; एक गाव, एक गणपती – सौ स्नेहलता कोल्हे
नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा
कोपरगाव : सर्वत्र कोरोना संकटाची गडद छाया असून गर्दी, नाच -गाने यांना फाटा केव्हा लागणार आहे मात्र परंपरा न सोडता नियमांचे पालन करून सावधान रहा, व साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ असावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले आहे.

दरवर्षी गणेशोत्सव सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून कलागूणांना वाव दिला जातो. या सार्वजनिक उत्सवात अबालवृध्द तसेच युवापिढी सहभागी होत असतात. कोरोना आहे पण गणेशोत्सव महाराष्ट्राची संस्कृति व परंपरा आहे. तो साजरा झालाच पाहिजे. परंतु त्याचबरोबर सामाजिक कर्तव्य समजून सावधान राहिले पाहिजे, तेव्हा गणेशोत्सव मंडळांनी कोरोना नियमांच्या अधीन राहून गर्दी , झगमगाट, गडबड गोंधळ ढोलताशे, नाच -गाने याची परवानगी नाही, तसेच सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे जरूरीचे आहे. गणेशोत्सवाचे स्वरूप मर्यादित असावे, तसेच या दरम्यान दैनंदिन आरती, धार्मिक कार्यक्रम हे प्रशासनाच्या वतीने सेवा देणा-या कोरोना योध्दयांच्या (तहसिलदार, स्थानिक प्रशासन, पोलीस, डॉक्टर, सफाई कामगार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, ) यांच्या हस्ते करण्यात यावे. सर्व दु:ख दूर करणा-या विघ्नहर्त्या श्री गणरायाचा उत्सव एक गाव,एक गणपती ही मोहीम राबवा प्रशासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य करा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.





