भर बाजारातील तरुणाच्या खुनातील मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी
The main accused in the murder of a youth in Bhar Bazaar has been remanded in police custody for seven days
खुनातील आणखी तीन आरोपींना मंगळवारी उशिरा अटकThree more suspects in the murder were arrested late Tuesday
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue4 Jan.2022 17.00Pm.
कोपरगाव : मोटरसायकलचा कट लागल्याच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून खून करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर अवघ्या सहा तासात अटक केली. या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी उशिरा उर्वरित तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने या खुनातील मुख्य आरोपीस १० जानेवारीपर्यंत पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
राहुल रवींद्र माळी रा. कोपरगाव मोहनीराज नगर, असे कोपरगावातून अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. याला मंगळवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती तपासी अधिकारी पोसई भरत दाते यांनी दिली आहे. राजेंद्र बबनराव भोसले (वय ३५, रा. गोपाळ वाडा संजीवनी कारखाना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत राजेंद्र याचा भाऊ रवींद्र भोसले (वय ३१) याने फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी राहुल माळी व त्याच्या साथीदारांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी कोपरगाव आठवडे बाजारात भर दुपारी राजेंद्र भोसले याचा लोखंडी रॉड गज फावडयाचा दांडा याने वार करून, तसेच दगडाने ठेचून खून करण्यात आला होता.खुन झाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर दिपाली काळे उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या नेतृत्वाखाली तपासी अधिकारी पोसई. भरत दाते व पोलीस पथकाने रात्रंदिवस गोदावरी नदी काठ पिंजून काढला . व या प्रकरणातील तीन फरारी आरोपी मटकी कानडे (पूर्ण नाव कळू शकले नाही)रा.लिंबारा मैदान कोपरगाव. गफुर अब्दुलगणी बागवान रा. लिंबारा मैदान, कोपरगाव, राहुल गणेश मगर रा. गोरोबानगर, कोपरगाव यांना मंगळवारी (४) रोजी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोसई भरत दाते यांनी दिली आहे. राजेंद्र भोसले यांचा खून झाल्याचे समजताच सोमवारी सायंकाळी गोपाळ वाड्यातून शे-दोनशे तरुणांचा घोळका कोपरगाव शहरात आला व त्यांनी आरोपीला अटक करा अशी मागणी केली या संतप्त जमावाने संत जनार्दन स्वामी या दवाखान्याचे व रुग्णवाहिकेचे काचा फोडून नुकसान केले. काही वेळ साई तपोभूमी चौकात रास्ता रोको करण्याचाही प्रयत्न केला परंतु पोलिसांनी आरोपींना अटक केल्यामुळे जमाव शांत झाला असून केवळ तणाव निवळला ने परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. दरम्यान मयत राजेंद्र भोसले यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पत्रकारांना दिली.